जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरडोना यांचं निधन, फुटबॉल विश्वात हळहळ

३० ऑक्टोबरला मॅरडोना यांचं अत्यंत क्लिष्ट असं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्या यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून ते वाचू शकले नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या प्रसिद्ध फुटबॉलपटू दियागो मॅरडोना यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दियागो मॅरडोना यांनी टिगरमधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

३० ऑक्टोबरला मॅरडोना यांचं अत्यंत क्लिष्ट असं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्या यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून ते वाचू शकले नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एअर्सजवळ असलेल्या ला प्लेटा इथल्या रुग्णालयात मॅरडोना यांना नेण्यात आलं. अर्जेंटिनातील माध्यमं गेले काही दिवस मॅरडोना यांची प्रकृती सुधारत असल्याचा बातम्या देत होती. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांना गाठलं.

२१ वर्षांची कारकीर्द

मॅरडोना यांची फुटबॉल कारकीर्द तब्बल २१ वर्षांची होती. त्यातील १९८६ हे वर्ष त्यांच्या करिअरमधलं सर्वाधिक लक्षवेधी आणि ऐतिहासिक ठरलं. हेच ते वर्ष होतं जेव्हा मॅरडोना यांनी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून दिला. १९८६ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी मॅरडोना यांनी केलेला गोल इतिहासात कायमचा नोंदवला गेला. हा गोल आजही ‘हँड ऑफ गॉड’ या नावानं ओळखला जातो.