violence in america
प्रतिकात्मक फोटो

अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटॉल इमारतीत झालेल्या हिंसाचारामुळे(violence in america) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जो बायडन यांच्या शपथविधीआधी(biden oath taking day) आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटॉल इमारतीत झालेल्या हिंसाचारामुळे(violence in America) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जो बायडन यांच्या शपथविधीआधी(biden oath taking day) आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसंच इतर ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे, एफबीआयने तसा इशारा दिला आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. वॉशिंग्टनला सुरक्षेसाठी जवळपास १५ हजार तुकड्या तैनात होणार आहेत. वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

एफबीआयने १६ जानेवारी ते २० जानेवारी या कार्यकाळात हिंसक आंदोलनाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच शपथविधी झाल्यानंतर पुढील तीन दिवसांसाठीही हा इशारा कायम आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटॉल हिलमधील हिंसाचारास उत्तेजनाच्या कारणास्तव महाभियोग चालवण्यासाठी कायदा संमत करण्याच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत, असं अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी स्पष्ट केलं आहे.