पंजशीरमध्ये तालिबान आणि बंडखोरांमध्ये भीषण युद्ध सुरु, दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे-प्रतिदावे

पंजशीरमध्ये विजय मिळवल्याच्या वृत्तानंतर झालेल्या आनंदापोटी ताबिबानने काबूल विमानतळावर गोळीबार केला, त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण या आनंदोत्सवापायी जखमी झाले आहेत. 

    काबूल: अफगाणिस्थानात पंजशीर खोऱ्यात तालिबान आणि रेजिस्टेंट फोर्स म्हणजेच बंडखोर यांच्यात भीषम युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंनी या युद्धात विजयी झाल्याचा दावा केला आहे. पंजबीरवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. पंजशीरमध्ये विजय मिळवल्याच्या वृत्तानंतर झालेल्या आनंदापोटी ताबिबानने काबूल विमानतळावर गोळीबार केला, त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण या आनंदोत्सवापायी जखमी झाले आहेत.

    दुसरीकडे पंजशीर खोऱ्यात लढत देत असलेल्या बंडखोरांनी तालिबानच्या विजयाचा दावा फेटाळून लावला आहे. तालिबानविरोधात युद्धात आघाडी मिळवल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. अफगाणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ल्ह सालेह यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, बंडखोर निकराने तालिबानच्या फोजांशी संघर्ष करत असल्याचे म्हटले आहे. सालेह हे स्वता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत, हेही त्यांनी या व्हिडिओत सांगितले आहे, आणि यास पाकिस्तान कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी या व्हिडिओत केला आहे. तसेच तजिकिस्तानात पलायन केल्याच्या वृत्ताचेही सालेह यांनी खंडन केले आहे. आपण अजूनही पंजशीरमध्येच असून, तालिबान्यांशी लढत असल्याचे त्यांनी या व्हिडिओत स्पष्ट केले आहे.