तालिबान आणि NRF मध्ये लढाई तेज, अमरुल्ला सालेहचा भाऊ ठार

अहमद मसूदचा समर्थन करणारे मार्श दोस्तम यांनी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान तसच आंतरराष्ट्रीय समुदयाला आवाहन केलंय. एनआरएफ आणि तालिबानमध्ये पंजशीरला घनघोर युद्ध सुरु आहे. त्याचा निकाल काहीही लागू शकतो. त्यामुळे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची घाई करु नका असं मार्शल दोस्तम यांनी म्हटलंय.

    पंजशीर व्हॅलीत (Panjshir valley)तालिबानी आणि एनआरएफ यांच्यातली लढाईनं वेग पकडलाय. विशेष म्हणजे ह्या लढाईत अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह(Rohullah Saleh)हा ठार झाल्याचं कळतंय. एवढच नाही तर पंजशीर व्हॅलीत जिथं जिथं तालिबाननं कब्जा केलाय तिथं तिथं मोठ्या प्रमाणात लोकांना अत्याचर केले जात असल्याचही रिपोर्ट समोर येताय. नेमके किती लोकांना मारलं गेलंय याचा निश्चित असा आकडा समोर आलेला नाही.

    काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधल्या एका लायब्ररीत बसून एक व्हिडीओ जारी केला होता. आता तिच लायब्ररी पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण तालिबानचा एक दहशतवादी त्याच खुर्चीवर बसलेला एक फोटो तालिबानकडून जारी करण्यात आलाय. याचाच अर्थ असा की, ज्या ठिकाणी बसून अमरुल्ला सालेह तालिबानला ललकारत होते त्याच ठिकाणी आता तालिबान पोहोचल्याचा दाखवलं जातंय.

    दरम्यान अहमद मसूदचा समर्थन करणारे मार्श दोस्तम यांनी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान तसच आंतरराष्ट्रीय समुदयाला आवाहन केलंय. एनआरएफ आणि तालिबानमध्ये पंजशीरला घनघोर युद्ध सुरु आहे. त्याचा निकाल काहीही लागू शकतो. त्यामुळे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची घाई करु नका असं मार्शल दोस्तम यांनी म्हटलंय.