‘या’ देशाने घेतलाय मोठा निर्णय, कोरोनाची लस घेतली नसेल तर गमवावी लागणार नोकरी

कोरोनाची लस न घेतलेल्यांना जॉब(Vaccine Compulsory For Job) देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा(Frank Benimarama) यांनी दिले आहेत.

  अनलॉकच्या काळात नागरिकांना दिलेली सूट आणि नियमांचं उल्लंघन यामुळे कोरोनाने(Corona Rules) पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली. यावर फिजी सरकारनं(Fijian Government Order) एक सूचना जारी केली आहे. कोरोनाची लस न घेतलेल्यांना जॉब(Vaccine Compulsory For Job) देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा(Frank Benimarama) यांनी दिले आहेत.

  हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे कोरोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दुसरीकडे कोरोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाला कोरोनाची लस घेणं अनिवार्य आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.

  मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जावं लागणार आहे. तर १ नोव्हेंबरपर्यंत कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास त्यांना कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे खासगी कंपन्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. लसीकरण गंभीरतेने न घेतल्यास मोठा दंड भरावा लागेल असं सांगितलं आहे.

  खासगी कर्मचाऱ्यांसाठी डेडलाइन १ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल. त्या कंपन्या बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे.

  “लस नाही तर जॉब नाही, कोरोनापासून बचावासाठी लस एकमात्र उपाय आहे. या आधारावर आम्ही नवी नियमावली आखली आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जॉब गमवावा लागेल”, असं फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी सांगितलं.

  गेल्या वर्षी कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्थेत १९ टक्क्यांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. फिजीमध्ये अर्ध्याहून अधिक रोजगार हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.

  फिजी या देशात आतापर्यंत ८ हजार ६६१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४५६ जणांना करोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ हजार १५७ करोनाचे रुग्ण आहेत.