याला म्हणतात नशीब फळफळणे! भारतीय व्यक्ती दुबईत तीन वर्षांपासून काढत होता लॉटरीचं तिकीट ; अखेरीस जिंकला तब्बल ४० कोटींचा जॅकपॉट

'मी २००८ पासून अबूधाबीत आहे. दुबई टॅक्सी आणि विविध कंपन्यांमध्ये मी चालक म्हणून काम केलं आहे. गेल्या वर्षभरापासून एका कंपनीत ड्रायव्हर-कम-सेल्समन म्हणून मी कार्यरत आहे. पगार कपातीमुळे आयुष्यातील समस्या वाढल्या. मात्र आता जॅकपॉट जिंकल्यानं आनंदी आहे,' असं सोमराजन यांनी सांगितलं.

    एका भारतीय व्यक्तीचे संयुक्त अरब अमिरातमध्ये नशीब फळफळले आहे. या व्यक्तीने दोन कोटी दिरहमची म्हणजे जवळपास ४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.गेल्या ३ वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटं खरेदी करत होते. अखेर त्यांचं नशीब उघडलं आणि त्यांना जॅकपॉट लागला.

    संयुक्त अरब अमिरातमध्ये ३७ वर्षांची भारतीय वंशाच्या व्यक्तीनं ही लॉटरी जिंकली आहे. मूळचे केरळचे रहिवासी असलेल्या रंजीत सोमराजन यांना ४० कोटी रुपयांची लॉटरी लागली. सोमराजन अबूधाबीमध्ये चालक म्हणून काम करतात. या बक्षीसात एकूण १० जणांचा वाटा असून इतर ९ जण विविध देशांमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती त्यानं दिली.जॅकपॉट लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. दुसरा किंवा तिसरा क्रमांक येईल अशी मला आशा होती, असं सोमराजन यांनी सांगितलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अनुक्रमे ३० लाख दिरहम आणि १० लाख दिरहम होती.

    ‘मी २००८ पासून अबूधाबीत आहे. दुबई टॅक्सी आणि विविध कंपन्यांमध्ये मी चालक म्हणून काम केलं आहे. गेल्या वर्षभरापासून एका कंपनीत ड्रायव्हर-कम-सेल्समन म्हणून मी कार्यरत आहे. पगार कपातीमुळे आयुष्यातील समस्या वाढल्या. मात्र आता जॅकपॉट जिंकल्यानं आनंदी आहे,’ असं सोमराजन यांनी सांगितलं.