कोविड-१९ ते मूळ शोधा, अन्यथा कोविड २६ आणि कोविड ३२ साठी तयार राहा, अमेरिकेकडून WHO ला धोक्याचा इशारा

कोविड-१९ चं मूळ लवकरात लवकर शोधा, अन्यथा कोविड-२६ आणि कोविड-३२ साठी तयार राहा, असा इशारा अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलाय. चीनमधील वुहान शहरातल्या प्रयोगशाळेतून कोविड-१९ चा विषाणू बाहेर पडला असावा, या तर्काला आधार देणाऱ्या अनेक गोष्टी सध्या समोर येत असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. मात्र चीनकडून या संशोधनासाठी पूर्णतः सहकार्य केलं जात नसल्याचंही सांगण्यात येतंय. 

    जगभरात गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोनाचा व्हायरस नेमका आला कुठून, याबाबत अद्यापही संभ्रमाचंच वातावरण आहे. हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार झाला की तो नैसर्गिकरित्या तयार झाला, याबाबत आजही संशोधकांमध्ये अनेक मतभेद आहेत. याच मुद्द्यावरून आता अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेला इशारा दिलाय.

    कोविड-१९ चं मूळ लवकरात लवकर शोधा, अन्यथा कोविड-२६ आणि कोविड-३२ साठी तयार राहा, असा इशारा अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलाय. चीनमधील वुहान शहरातल्या प्रयोगशाळेतून कोविड-१९ चा विषाणू बाहेर पडला असावा, या तर्काला आधार देणाऱ्या अनेक गोष्टी सध्या समोर येत असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. मात्र चीनकडून या संशोधनासाठी पूर्णतः सहकार्य केलं जात नसल्याचंही सांगण्यात येतंय.

    कोरोनाचा व्हायरस चीनच्या जंगलातून, जंगली प्राण्यांपासून तयार झाला की तो जाणीवपूर्वक वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला, असा प्रश्न अद्यापही कायम आहे. जगाची कोरोनापासून कायमस्वरुपी सुटका करायची असेल, तर या प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय गत्यंतर नाही, असं अमेरिकेनं म्हटलंय.

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असणाऱ्या स्कॉट गॉटिलेब यांनी ही भीती व्यक्त केलीय. गॉटिलेब हे सध्या फायझरच्या संचालक मंडळाचे सदस्यही आहेत. कोरोना विषाणूचं मूळ समजलं नाही, तर या विषाणूचे नवनवे व्हर्जन येतच राहतील, असा इशारा त्यांनी दिलाय. आता यावर जागतिक आरोग्य संघटना आणि चीन यांच्याकडून काय प्रतिसाद येतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.