fire in nasirya hospital

नसीरिया शहरातील अल-हुसेन कोविड रुग्णालयात सोमवारी भीषण आग(Fire In nasiriya Covid Hospital) लागली. या दुर्दैवी घटनेत २ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ जणांचा होरपळून मृत्यू (44 Death In Fire)झाला आहे.

    नसीरिया : इराकच्या (Iraq) दक्षिण भागातील नसीरिया शहरातील अल-हुसेन कोव्हिड रुग्णालयात सोमवारी भीषण आग(Fire In nasiriya Covid Hospital) लागली. या दुर्दैवी घटनेत २ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ जणांचा होरपळून मृत्यू(Death In Fire) झाला आहे. तर ६७ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे.

    कोविड वॉर्डातील ऑक्सिजनच्या सिलेंडरचा विस्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस या आगीचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

    या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी यांनी तातडीनं वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. तसेच नसीरिया रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करून अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

    या अपघातानंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयातून अनेक रुग्णांचे जळलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले. अनेक रुग्ण धुरामुळे गुदमरून बेशुद्धावस्थेत आढळले आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आगीचं नेमकं कारण शोधलं जात आहे. अनेक लोकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर बरेच लोकं अद्याप बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे.