मंकी व्हायरसमुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू, लागण झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर दिसतात लक्षणे

करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. ज्यात ताप आणि थंडी, स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. कालांतराने, विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस जखमेत लहान लहान फोडं येऊ शकतात, तर इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा, मळमळ आणि उलट्या होणे, पोटदुखी आणि हिचकीचा समावेश आहे.

    माकडांमधून पसरणाऱ्या बी विषाणूच्या संसर्गामुळे म्हणजेच ‘मंकी बी’ व्हायरस Monkey B Virus ने चिंता वाढली आहे. याबद्दल अद्याप फारसा अभ्यास झालेला नाही. परंतु, या व्हायरसमुळे एका पशुवैद्याचा मृत्यू झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत अद्याप कोणतंही ठोस संशोधन झालं नसलं तरी कोरोना पाठोपाठ आता एका नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे.

    Monkey B व्हायरसची लागण झालेल्या ५३ वर्षीय डॉक्टरला पहिल्यांदा मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर ताप आणि न्यूरोलॉजिकल समस्या जाणवल्या. ते अनेक रुग्णालयांत उपचारासाठी गेले परंतु २७ मे रोजी त्यांचे निधन झाले. या डॉक्टरने दोन माकडांचे ऑपरेशन केले होते. सीडीसी साप्ताहिकानुसार, एप्रिलच्या मध्यात संशोधकांनी रुग्णाच्या काही द्रव्यांची तपासणी केली. यानंतर, निकालांमध्ये अल्फाहेरव्हायरसचा विषाणूचा संसर्ग असल्याची माहिती मिळाली.

    करोना व्हायरसप्रमाणे मंकी बी व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. ज्यात ताप आणि थंडी, स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश आहे. कालांतराने, विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस जखमेत लहान लहान फोडं येऊ शकतात, तर इतर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा, मळमळ आणि उलट्या होणे, पोटदुखी आणि हिचकीचा समावेश आहे.

    चिनी सीडीसी वीकलीनुसार, मंकी बी व्हायरस थेट संपर्काद्वारे आणि शरीराबाहेर द्रव्याव्दारे बाहेर पसरतो. हा व्हायरस १९३२ मध्ये आढळला होता. हा व्हायरस थेट संपर्क आणि शारीरिक स्रावाद्वारे पसरतो.  हा व्हायरस आफ्रिकन लंगूरपासून उद्भवला आहे. आतापर्यंत ६० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यातील ७० ते ८० टक्के रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जेव्हा मंकी व्हायरस मानवामध्ये पसरतो तेव्हा तो केंद्रीय मज्जासंस्थेवर प्रभावीत होतो. व्हायरची लागण झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर लक्षणे दिसतात.