अमेरिकेपाठोपाठ आता नेपाळमध्येही भारतीय नागरिकांच्या प्रवेशास बंदी; २२ प्रवशेद्वारे नेपाळने केली बंद

कोरोना विषाणूची दुसरी लाट भारतात उग्न रुप घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारतीय विमान वाहतूकीवर विविध निर्बंध लादले आहेत. विशेष म्हणजे सध्या नेपाळमध्येही कोरोना विषाणूचा धोका गडद होत चालला आहे.

     

    भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उडालेला हाहाकार हा जगातील इतर देशासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे अमेरिके पाठोपाठ आता नेपाळनेही भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करणारी २२ प्रवेशद्वारे बंद केली आहेत. विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नेपाळ प्रशासनाने म्हटले आहे.

    भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळने कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या वेळीही अशा प्रकारची कारवाई केली होती. पण कोरोना विषाणूची पहिली लाट ओसरताचं त्यांनी पुन्हा निर्बंध हटवले होते . पण सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट भारतात उग्न रुप घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारतीय विमान वाहतूकीवर विविध निर्बंध लादले आहेत. विशेष म्हणजे सध्या नेपाळमध्येही कोरोना विषाणूचा धोका गडद होत चालला आहे.

    नेपाळमध्ये काल एकाच दिवशी विक्रमी ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त एका संकेत स्थळाने दिले आहे. हा आकडा एकाच दिवसांत होणाऱ्या मृतांच्या आकडेवारीत सर्वाधिक आहे. नेपाळमध्ये आतपर्यंत एकूण 3 हजार 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात दरदिवशी तीन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहेत . पण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील काही काळापासून नेपाळमध्ये मृत्यूदर वाढला आहे.