उत्तर कोरियात अन्नाचा तुटवडा ; तीन हजार रुपये किलो दराने होतेय केळ्यांची विक्री

उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयांग येथे सुरू झालेल्या देशातील सत्तारूढ कामगार पक्षाच्या महत्त्वपूर्ण केंद्रीय समितीच्या बैठकीत किम जोंग उन यांनी देशातील अन्नटंचाई परिस्थितीविषयी चर्चा केली. भूकबळीच्या संकटापासून लोकांना दिलासा देण्यासाठी 'मुश्किल मार्च' ((The Arduous March) सुरु करण्यात येणार आहे.

    आपल्या अजब दावे व बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हुकूमशाह किम जोंग उन यांनी प्रथम औपचारिकरित्या देश अन्नासाठी झगडत असल्याची माहिती दिली आहे. देशातील नागरिकांची अन्नासाठीची स्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. गतवर्षी शेतमालाच्या उत्पादनाचे लक्ष पूर्णकरू न शकल्याने परिस्थती ओढवली आहे.
    देशातील अन्नाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर कोरियाच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार केळ्यांची प्रति किलो किंमत तीन हजर रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे.
    उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयांग येथे सुरू झालेल्या देशातील सत्तारूढ कामगार पक्षाच्या महत्त्वपूर्ण केंद्रीय समितीच्या बैठकीत किम जोंग उन यांनी देशातील अन्नटंचाई परिस्थितीविषयी चर्चा केली. भूकबळीच्या संकटापासून लोकांना दिलासा देण्यासाठी ‘मुश्किल मार्च’ ((The Arduous March) सुरु करण्यात येणार आहे.

    उत्तर कोरियामध्ये ९० च्या दशकात वापरला जात होता जेव्हा देशात तीव्र दुष्काळ पडला होता. त्यानंतर सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर उत्तर कोरियाला मदत मिळणे बंद झाले. त्या दुष्काळाच्या वेळी उपासमारीने किती लोक मरण पावले याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती नाही, परंतु असे मानले जाते की ही संख्या जवळजवळ तीस दशलक्ष असावी.