उत्तर कोरियावर अन्न टंचाईचे सावट ; भुकबळी उद्भवण्याची शक्यता

कोविडमुळे संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे उत्तर कोरियाच्या चीन मधील व्यापारालाहीं निर्बंध आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात आलेला उत्तर कोरिया आता पुरता संकटात सापडला आहे. काही तज्ज्ञांच्या मते त्या देशाला या वर्षी किमान एक दशलक्ष टन अन्नाची कमतरता भासू शकते. त्यामुळे त्या देशात भुकबळीचीही स्थिती उद्‌भवू शकते

    उत्तर कोरिया देशात सद्यस्थितीला भीषण अन्न टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. हुकुमशाही राजवटीचे प्रमुख किम जोंग यांनीही या अन्न संकटाची आपल्या देशातील जनतेला जाणिव करून दिली असून या संकटासाठी तयार राहण्याची सूचना जनतेला केली आहे.

    काळात कोविडमुळे संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे उत्तर कोरियाच्या चीन मधील व्यापारालाहीं निर्बंध आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात आलेला उत्तर कोरिया आता पुरता संकटात सापडला आहे. काही तज्ज्ञांच्या मते त्या देशाला या वर्षी किमान एक दशलक्ष टन अन्नाची कमतरता भासू शकते. त्यामुळे त्या देशात भुकबळीचीही स्थिती उद्‌भवू शकते असे सांगण्यात येते.

    या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीने देशातील कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न हाती घेण्याची गरज व्यक्‍त केली आहे. उत्तर कोरियात अजूनही कोविडचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे तेथील गाळात रुतलेले अर्थचक्र इतक्‍यात वेगवान होण्याची शक्‍यता नाही.