धक्कादायक- दहा दिवस ‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटीव्ह, मात्र मृत्यूचे कारण ऐकताच नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली

 ब्रिटनमधील स्टॅनफोर्डशायर इथल्या रॉयल स्टोक युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात डेबरा शॉdeath by corona) नावाची महिला दाखल झाली होती. या महिलेचा दहा दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला.

    लंडन: जगभरात कोरोना रुग्णांबाबतच्या आणि त्यांच्या उपचाराबाबतच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशीच एक घटना ब्रिटनमधील स्टॅनफोर्डशायरमधून समोर आली आहे.

    एक ५५ वर्षीय महिला रुग्णालयात (Hospital) दाखल झाली. महिलेचा हर्नियाचं ऑपरेशन झालं. दहा दिवस ही महिला रुग्णालयातच राहिली. या दहा दिवसात दररोज तिची कोरोना चाचणीही करण्यात आली. महिलेला कोरोना प्रूफ वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. महिलेचा दररोजचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र तरीही दहा दिवसांनंतर तिचा मृत्यू  झाला.

    महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयानं महिलेला कोरोना असल्याचं सांगितल्याचं तिच्या मुलानं म्हटलं आहे.

    ब्रिटनमधील स्टॅनफोर्डशायर इथल्या रॉयल स्टोक युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात डेबरा शॉ नावाची महिला दाखल झाली होती. या महिलेचा दहा दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांना अंतिम दर्शनासाठी बोलावलं गेलं. कुटुंबियांना असं सांगण्यात आलं, की महिलेला कोरोना नव्हता. मात्र, रुग्णालयातच रिकव्हरीदरम्यान तिला निमोनिया झाला. या काळात रुग्णालयातील डॉक्टरांनीही कुटुंबीतील सदस्यांची गळाभेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं. मात्र, आता काहीतरी वेगळंच समोर आलं आहे.

    डेबरा शॉ या त्या महिलेच्या मुलानं सांगितलं की, नंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की माझी आई कोरोना पॉझिटिव्ह होती. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर ती कोरोनाबाधित होती, तर सलग दहा दिवस तिचा अहवाल निगेटिव्ह कसा आला?  जर ती खरंच पॉझिटिव्ह होती, तर संपूर्ण कुटुंबाला तिच्याजवळ घेऊन जात, सगळ्यांचा जीव धोक्यात का घातला?

    या सगळ्या प्रकारानंतर महिलेचे कुटुंबीय रुग्णालयाविरोधात तक्रार करणार आहेत.