उदरनिर्वाहासाठी अफगाणिस्तानचे ‘हे’ माजी माहिती तंत्रज्ञान ( IT ) मंत्री जर्मनीत विकतायत ‘पिझ्झा’

सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये उदरनिर्वाहासाठी पिझ्झा विकतअसल्याचे समोर आले आहे. अहमद शाह पिझ्झा कंपनीचा ड्रेस परिधान करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत.

    तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा(The Taliban occupy Afghanistan) केल्यानंतर हजारो अफगाणी नागरिक जीव वाचवण्यासाठी स्थलांतरचा मार्ग अवलंबत आहेत. ज्या देशात जसे मिळे तसे हे नागरिक स्थलांतर करताना दिसत आहेत. अशातच एकेकाळी अफगाणिस्तानचे माजी माहिती तंत्रज्ञान ( IT ) मंत्री(Former Afghan IT ministe) सय्यद अहमद शाह सादत(Syed Ahmed Shah Sadat) जर्मनीमध्ये उदरनिर्वाहासाठी पिझ्झा विकतअसल्याचे समोर आले आहे. अहमद शाह पिझ्झा कंपनीचा ड्रेस परिधान करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत.

    तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेताच अहमद शाह यांनी देशातून पलायन करत जर्मनी येथे आसरा घेतला आहे. एकेकाळी अफगाणिस्तान आयटीमंत्री म्हणून कार्यरत असतानादेशात सेलफोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. अलजझिराचा या वृत्तवाहिने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती घनी आणि सय्यद अहमद शाह सादत यांच्यात टोकाचे मत भेद होते. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीच माहिती मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.