Four cars filled with money, even in a helicopter, money crashed, some money fell on the road; Where did the President of Afghanistan go?

देश सोडताना गनी यांनी मोठा डल्ला मारला आहे. गनी यांनी चार कारमध्ये पैसे भरले. उरलेले पैसे त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये कोंबले. तरीही खूप पैसे उरले. याततील काही पैसे रस्त्यावर पडले. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही.

    काबूल : सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला असून ते ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे गनी आता अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. गनी सध्या ओमानमध्ये थांबले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे गनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

    देश सोडताना गनी यांनी मोठा डल्ला मारला आहे. गनी यांनी चार कारमध्ये पैसे भरले. उरलेले पैसे त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये कोंबले. तरीही खूप पैसे उरले. याततील काही पैसे रस्त्यावर पडले.

    तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली आहे. राजधानी काबूलवर तालिबानी फौजांनी ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पलायन केले आहे. काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे. परंतू देशात अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव मात्र या सत्तांतरानंतर टांगणीला लागला आहे. देश सोडण्यासाठी विमानतळापासून प्रत्येक ठिकाणी धावपळ सुरू झाली आहे.