france crackdown 76 mosques suspected separatism

एका अंदाजानुसार फ्रान्सची लोकसंख्या जवळपास ६.५० कोटी आहे. त्यापैकी ७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. देशात एकूण २६०० मशिदी असून तीन वर्षात तीन मशिदींना सरकारने टाळे ठोकले आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, पॅरिस.

फ्रान्समध्ये पैगंबर मोहंमद यांच्यावरील वादग्रस्त कार्टूननंतर हिंसाचार उसळला होता. त्यावेळी जगातील अन्य मुस्लिम देशांनी इस्लामिक कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविला होता. फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यानंतरच सरकारने मुस्लिम कट्टरपंथियांवर कारवाईला वेग दिला आहे.

फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डेरेमॅनियन यांनी ७६ मशिदींची तपासणी केली जात असून कट्टरपंथाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर बंदी घातली जात असल्याची माहिती दिली. ज्या मशिदींविरोधात पुरावे आढळले आहेत त्या मशिदी बंद होणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. देशातील काही भागात कट्टरता आणि फुटीरवादाला प्रोत्साहन मिळत असल्याचे पुरावे आढळले असून त्याविरोधात कठोर पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

२६०० पेक्षा अधिक संख्या

फ्रान्समध्ये ७६ मशिदी सरकारच्या रडारवर असून या सर्वांची तपासणी सुरू आहे. त्यापैकी १६ पॅरिस आणि नजिकच्या भागात आहेत तर उर्वरित ६० देशाच्या अन्य भागात आहेत. एका अंदाजानुसार फ्रान्सची लोकसंख्या जवळपास ६.५० कोटी आहे. त्यापैकी ७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. देशात एकूण २६०० मशिदी असून तीन वर्षात तीन मशिदींना सरकारने टाळे ठोकले आहे.