google

फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन गूगलला 22 कोटी यूरो अर्थातच 1953 कोटी रुपये एवढा मोठा दंड केला आहे.खरंतर मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहेत. त्यामुळे युरोपातील अन्य लघु आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांवर खूप मोठा दबाव निर्माण झाला आहे.

    पॅरिस :  जगातील सर्वात जास्त डाटा गूगल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या कंपनीचं जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. सध्याच्या आधुनिक जगात गुगलशिवाय जगणं कठीण बनलं आहे. अशातच फ्रान्सने गुगलला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.

    फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन (Market Competition Regulator) रेग्युलेटरने गूगलवर (Google) ही कारवाई केली आहे. ऑनलाईन जाहिरातींच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

    फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन गूगलला 22 कोटी यूरो अर्थातच 1953 कोटी रुपये एवढा मोठा दंड केला आहे.खरंतर मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहेत. त्यामुळे युरोपातील अन्य लघु आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांवर खूप मोठा दबाव निर्माण झाला आहे.

    अशातच ऑनलाईन जाहिरातीच्या बाबतीत बाजारपेठेच्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याच्या कारणावरून फ्रान्सच्या मार्केट नियामकाने सोमवारी गूगलला हा दंड ठोठावला आहे.