राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फ्रान्सने उचलले महत्त्वाचे पाऊल , लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन उडाली खळबळ

 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन चांगलीच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी एका मजिस्ट्रेटच्या माध्यमातून आरोपींची चौकशी सुरु केली होती. राफेल लढाऊ विमानाचे डिल करताना फ्रान्सचे पूर्व राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांची सही होती.

    राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फ्रान्सने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराचा आणि घोटाळा करणाऱ्या आरोपींची चौकशी करण्यात येणार असल्याचे फ्रान्स पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेच्या फायनान्शिअल क्राइम ब्रांचकडून सांगण्यात आले आहे.

    राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन चांगलीच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी एका मजिस्ट्रेटच्या माध्यमातून आरोपींची चौकशी सुरु केली होती. राफेल लढाऊ विमानाचे डिल करताना फ्रान्सचे पूर्व राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांची सही होती. त्याचप्रमाणे आता असलेले फ्रान्सचे पंतप्रधान तेव्हा अर्थमंत्री होते. तसेच तत्कालीन परराष्ट्र मंत्री जीन यवेस ले ड्रियान यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    २०१८मध्ये शेरपा यांनी तक्रार दाखल केली होती मात्र PNF ही तक्रार फेटाळून लावली होती. त्यावेळी राफेल लढाऊ विमानांचे ७.८ मिलियन युरोमध्ये डिल करण्यात आले होते. या प्रकरणी राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या डसॉल्ट एविएशन या कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.