'Fucking' ... the name must have been heard? For this reason, tourists pay a visit to this village

ऑस्ट्रिया : गावांची चित्र-विचित्र नाव आपण अनेकदा ऐकतो. मात्र, मध्य युरोपातील (Central Europe) ऑस्ट्रिया (Austria) येथील एका गावाचे नाव एकदमच विचित्र आहे. म्हणूनच तर या गावाच्या नावाच्या पाटीसह फोटो काढण्यासाठी अनेक पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात.

ऑस्ट्रियाचं हे गाव जर्मनीच्या सीमेजवळ आहे. लोकसंख्या कमी असूनही फक्त आगळ्या-वेगळ्या नावामुळे हे गाव खूप चर्चेत असतं. हे गाव सहाव्या शतकात स्थापित करण्यात आल्याची माहिती आहे.

या विचित्र नावामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले असून,  नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या वेबसाइटवर नाव बदलण्याचा निर्णय पोस्ट करण्यात आला आहे. याची पुष्टी स्थानिक महापौरांनी स्वत: केली आहे. या गावाचे नवीन नाव ‘Fugging’ असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नावातील बदल १ जानेवारी २०२१ पासून अंमलात येणाक आहे. पूर्वीच्या नावाऐवजी आता हे गाव Fugging म्हणून ओळखले जाणार आहे. फक्त १०० इतकी लोकसंख्या असलेल्या या गावाला विचित्र नावांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.