Game of Thrones..च्या सर्वेसर्वा लिनची यांची हत्या, साखरेमधून देण्यात आलं विष!

गेम डेव्हलपर योझू कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिनची यांचा ख्रिसमसच्या दिवशीच मृत्यू झाला. लिन ची हे हे जगभरामध्ये गेम ऑफ थोन्स यांची गेमचे निर्माते म्हणून ओळख होती. त्यांनी नेटफ्लिक्सवरील अनेक चित्रपटांची निर्मातीही केली आहे.  लिन हे अवघ्या ३९ वर्षांचे होते. लिन ची यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अस्वस्थ वाटू लागल्याने लिन ची यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लिन यांना चहामधील साखरेतून विष देण्यात आलं. शंघाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिन ची यांचे सहकारी जू याओ यांना या प्रकरणामध्ये प्रमुख संशयित आहेत. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लिन ची गणना होते. त्यांची एकूण संपत्ती ६.८ बिलियन युआन म्हणजेच ७६ अरब ६० कोटी रुपये इतकी आहे. शुक्रवारी लिन यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या कंपनीचे अनेक माजी कर्मचारी आणि चाहते शोक व्यक्त करण्यासाठी योझूच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते.

गेम ऑफ थ्रोन्सचा निर्माता

लिन ची यांनी २००९ साली योझू कंपनीची स्थापना केली. मोबाईल गेमिंग आणि गेमिंग क्षेत्रामध्ये लिन ची यांनी चांगलं नाव कमावलं होतं आणि आपली नवी ओळख निर्माण केली. योझू ही गेम डेव्हलपर आणि ब्राउझर तसेच मोबाइल गेम पब्लिशर आहे. ही कंपनी प्रामुख्याने आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये व्यापार करते. कंपनीनेही लिनच्या मृत्यूनंतर एक पत्र प्रकाशित करुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.