General Bajwas legs were shaking sweat was also breaking Abhinandan to the release of the Pakistani leader in Parliament
त्यावेळी जनरल बाजवांची झाली होती अशी गत की...

विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला सोडवण्यासाठी भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री घाबरले होते, बैठकीत त्यांचे पाय लटपटत होते आणि घाम फुटला होता, असा दावा पाकिस्तानी संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला आहे.

  • जनरल बाजवांचे पाय लटपटले, घामही फुटला होता
  • अभिनंदनच्या सुटकेबाबत पाक नेत्याचा संसदेत खुलासा

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला सोडवण्यासाठी भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री घाबरले होते, बैठकीत त्यांचे पाय लटपटत होते आणि घाम फुटला होता, असा दावा पाकिस्तानी संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मागील वर्षी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी एफ-१६ फायटर जेटला नेस्तनाबूत केले होते. मात्र त्यानंतर त्यांचं विमान देखील क्रॅश झालं आणि ते पीओकेमध्ये पडलं होते. या मुद्यावरुन पाकीस्तानात अजूनही राजकारण सुरूच आहे. भारताच्या हल्ल्याला घाबरुन इमरान खान सरकारने भारतीय वायुदलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना अचानक सोडण्याचा निर्णय घेतला होता, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानी खासदार अयाज सादिक यांनी संसदेत दावा केला आहे की,मला चांगलंच आठवतंय की, या बैठकीत महमूद शाह कुरैशी उपस्थित होते. या बैठकीला येण्यास इमरान खान यांनी नकार दिला होता. यावेळी कुरेशी यांचे पाय थरथरत होते. त्यांच्या डोक्याला घाम आला होता.

कुरेशी आम्हाला म्हणाले की, अभिनंदनला परत जाऊ द्या, कारण रात्री ९ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. अयाज सादिक म्हणाले की, भारत पाकिस्तानवर कुठलाही हल्ला करणार नव्हता. तथापि ही बैठक केव्हा झाली होती याबाबत मात्र त्यांनी खुलासा केला नाही.

विंग कमांडर अभिनंदन १ मार्चला देशात परतले होते

फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानी लढाई विमानांनी भारतीय हवाई सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान मिग-२१ वर असलेले विंग कमांडर वर्धमान यांनी पाकिस्तानच्या F-१६ एअरक्राफ्ट पाडले होते. यामध्ये त्यांचे विमान पाकिस्तानात जाऊन पडले. यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना १ मार्चला अटारी-वाघा बॉर्डरवरुन भारतात परतले होते.