जर्मन चान्सलर एंजेला मार्केल मास्क विसरल्या; घाबरून उडाली धांदल अन् व्हिडिओ झाला व्हायरल

जर्मन चान्सलर एंजेला मार्केल (Angela merkel) जर्मनीत शुक्रवारी संसदेत संबोधित करताना घाबरल्या कारण त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातलेला नव्हता. पण प्रत्यक्षात त्या त्यांचा मास्क पोडियमवरच विसरल्या होत्या.

    जर्मनी : कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या प्रादुर्भावाने जगभरात कहर केलाय. अशातच सर्वसामान्य जनतेपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच आपल्या चेहऱ्यावर नाईलाजाने मास्क घालण्याची नामुष्की ओढवली आहे. जीवघेण्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जर्मनीत अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यातून आपल्या सर्वांनाच एक धडा घेण्याजोगा आहे.

    त्याचं झालं असं की, जर्मन चान्सलर एंजेला मार्केल (Angela merkel) जर्मनीत शुक्रवारी संसदेत संबोधित करताना घाबरल्या कारण त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातलेला नव्हता. पण प्रत्यक्षात त्या त्यांचा मास्क पोडियमवरच विसरल्या होत्या. हे लक्षात आल्यावर घाबरलेल्या त्यांनी पोडियमकडे धाव घेतली. हा व्हिडिओ न्यूज एजन्सी रॉयटर्सने जारी केला आहे. एजन्सीने जारी केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ” एंजेला मार्केल एका भाषणानंतर पोडियमवर त्यांचा फेस मास्क विसरतात तेव्हा…”

    जारी करण्यात आलेल्या व्हिडिओत पाहू शकता की, एंजेला मार्केल यांनी त्यांच्या फाइल्स टेबलावर (Angela Merkel Forgets Face Mask) वर ठेवल्यानंतर, त्यांना जाणवलं की, त्या त्यांच्या मास्क पोडियमवर विसरून आल्या आहेत. झाल्या प्रकारामुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. यानंतर लगेचच त्या पोडियमकडे धावल्या आणि तेथे विसरलेला मास्क त्यांनी घेतला. तेथील एका महिलेने मास्क साफ करून त्यांच्याकडे दिला.

    सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लोकांनी मार्केल यांच्या या जबाबदारपणाचे कौतुक केले आहे. आतापर्यंत एक मिलियनहून अधिकवेळा हा व्हिडिओ लोकांनी पाहिला असून यावर ते आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.