angela merkel

 जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल(angela merkel) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंपन्यांना धारेवर धरले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्लॅटफॉर्म निश्चित करु शकत नाहीत, असे मर्केल यांनी म्हटले आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल(angela merkel) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंपन्यांना धारेवर धरले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्लॅटफॉर्म निश्चित करु शकत नाहीत, असे मर्केल यांनी म्हटले आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी सांगितले आहे की, वैचारिक स्वातंत्र्याला सर्वात आधी प्राधान्य दिलं पाहिजे. हे स्वातंत्र्य हा सर्वांचाचा मूलभूत अधिक असून त्या सोबत छेडछाड करता कामा नये. विचार स्वातंत्र्यावर केवळ कायद्याच्या माध्यमातून निर्बंध आणले जाऊ शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोणत्याही व्यक्तीच्या अकाऊंटवर बंदी आणणे चुकीचे आहे असंही मर्केल यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतील संसदेमध्ये म्हणजेच कॅपिटॉल इमारतीत ६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने नऊ जानेवारीपासून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली होती. नंतर ट्विटरने जारी केलेल्या पत्रकामध्ये ट्रम्प यांचं अकाऊंट कायमचं बंद केलं जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर मर्केल यांनी हे वक्तव्य केले आहे.

अमेरिकन संसदेतील हिंसाचारानंतर फेसबुकनेही ७ जानेवारीपासून ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केलं आहे. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असं म्हटलं होतं.