युद्धासाठी तयार रहा : पाक जनरल बाजवांचे आदेश

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला (Gilgit Baltistan) पाकिस्तानच्या (Pakistan) राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा (Pak General Bajwa) यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सैन्याला युद्धास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

 मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानला (Gilgit Baltistan) पाकिस्तानच्या (Pakistan) राज्याचा दर्जा देण्याच्या निर्णयाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा (Pak General Bajwa) यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सैन्याला युद्धास सज्ज राहण्याचे निर्देश दिले. भारत आणि चीनदरम्यान लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव सुरू आहे. अशातच पाकिस्तानच्या हालचालींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा

पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत प्रत्यक्ष नियंत्रण भागाचा दौरा केला. यावेळी गिलगिटमध्ये स्थानिक कमांडरांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबतची सध्याची परिस्थिती आणि आपल्या सैन्याच्या तयारीबाबतची माहिती बाजवा यांना दिली. त्यावेळी पाक लष्करप्रमुखांनी त्यांच्या जवानांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

फायरिंग रेंजचाही केला होता दौरा

बाजवा यांनी काही दिवसांपूर्वीच पंजाब प्रांतातील फिल्ड फायरिंग रेंजचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी चिनी बनावटीच्या बेटल टँक व्हीटी-४ चाही आढावा घेतला. जनरल बाजवा यांनी सांगितले की, पाकिस्तान लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. कोणीही आमच्या देशाच्या संप्रभुतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले.

गिलगिट-बाल्टिस्तान मुद्यावर विरोध

दरम्यान, गिलगिट-बाल्टिस्तान प्रातांचा दर्जा देण्याचा निर्णय प्रक्रियेला पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. पाकिस्तान लष्करप्रमुखांनी गिलगिटच्या मुद्यावर विरोधी पक्षांसोबत काही दिवसांपूर्वी लष्करी मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. यामध्ये नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, आसिफ अली जरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते. त्याशिवाय गुप्तचर संघटना आयएसआयचे नेतेही उपस्थित होते.बाजवा यांनी म्हटले की, चिनी रणगाडे भविष्यातही आक्रमक कारवाई करण्यास मदतशीर ठरतील. चिनी रणगाडे जगातील अत्याधुनिक रणगाड्यांपैकी एक आहेत. हल्ला करण्यासह बचाव करण्यासही हे रणगाडे सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले.