लस घ्या ! अन्यथा नोकरीला मुका; दोन विमान कंपन्याचा आदेश

    वॉशिंग्टन (Washington) : जगातील अनेक देशात अद्यापही कोरोना बाधितांची (The number of corona cases) संख्या वाढतच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या (Canada) वेस्ट जेट (West Jet) आणि अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सने (the United States) सर्व कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक लस घेणे सक्तीचे केले आहे.

    लस न घेतल्यास नोकरीला मुकावे लागेल, असा सज्जड दमही दिला आहे. वेस्ट जेटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 24 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा अहवाल देण्यास किंवा 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यास सांगितले आहे. तर अमेरिकेतील यूनायटेड एअरलाइंसने 27 सप्टेंबरची मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक असेल.