सिलिंगला लटकत होतं केस असलेलं डोकं, सत्य समोर येताच मदतीसाठी केलं पाचारण

ही घटना दक्षिण -पश्चिम चीनमधील गुईझोऊ प्रांताच्या पुडिंग काऊंटीमध्ये असलेल्या एका घरात घडली. वास्तविक, घराच्या पहिल्या मजल्यावरील एक्सट्रॅक्शन फॅनसाठी ८-इंच छिद्र सोडले होते. पण मुलीला याबद्दल माहिती नव्हती.

  चीनमध्ये घडली घटना

  चीनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे मुलीचे डोके छतामध्ये अडकलेले पाहून तिचे आई -वडील हादरले. कारण हे दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटापेक्षा कमी नव्हते. खरं तर, जेव्हा त्यांनी ‘केसांचा एक बॉल’ छतावर लटकलेला पाहिला तेव्हा ते घाबरले. पण काही सेकंदांनंतर, त्यांच्या लक्षात आले की, हे त्यांच्या मुलीचे डोके आहे, जे छतामध्ये अडकले आहे. यानंतर त्यांनी तातडीने बचाव पथकाला बोलावले. एका तासाच्या प्रयत्नानंतर मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

  कसे अडकले डोके?

  ही घटना दक्षिण -पश्चिम चीनमधील गुईझोऊ प्रांताच्या पुडिंग काऊंटीमध्ये असलेल्या एका घरात घडली. वास्तविक, घराच्या पहिल्या मजल्यावरील एक्सट्रॅक्शन फॅनसाठी ८-इंच छिद्र सोडले होते. पण मुलीला याबद्दल माहिती नव्हती. म्हणून तिने त्या छिद्रात डोके ठेवले आणि खाली पाहण्याचा प्रयत्न केला! पण जेव्हा तिने डोके काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळले की तिचे कपाळ अडकले आहे.

  तेलाच्या मदतीने काढले अडकलेले डोके

  मुलीला अडचणीत पाहून पालकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले, त्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. त्यांनी प्रथम मुलीचे डोके खालच्या बाजून वर ढकलले. पण काहीच होत नाही हे पाहून त्यांनी काही साधनांचाही वापर केला. तथापि, जेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी तेलाचा वापर केला, तेव्हा त्यांनी मुलीला संकटातून बाहेर काढण्यात यश मिळवले.

  मुलीला कोणतीही इजा झाली नाही

  अंशुन फायर रेस्क्यू येथील पुडिंग डिव्हिजनचे कमांडर यांग हाओ यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले, मुलगी सुमारे एक तास छिद्रात अडकली होती. बचाव पथकाला त्याला बाहेर काढण्यासाठी सुमारे ४० मिनिटे लागली. मुलीला सामान्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात तिला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

  पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ

  या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २९ ऑगस्ट रोजी KLH43 या यूट्यूब चॅनेलने ही क्लिप शेअर केली होती, जिला कालपर्यंत १६,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.