Breakups are followed by rape allegations; Shocking statement of the chairperson of the women's commission

एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत वेगळ्या पद्धतीनं बदला (Unique Style Revenge Of Boy friend) घेतल्याची घटना समोर आली आहे.

    झेझियांग : प्रेमात धोका मिळाल्यानंतर बदला घेण्यासाठी प्रियकर (Boyfriend) अथवा प्रेयसी (Girl friend) कोणत्याही थराला जातात. अनेकदा मारहाण किंवा हत्येपर्यंत प्रेम प्रकरण पोहोचतं. पण एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत वेगळ्या पद्धतीनं बदला (Unique Style Revenge Of Boy friend) घेतल्याची घटना समोर आली आहे.

    एका तरुणीला प्रेमात धोका मिळाल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या कारनं शहरातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४९ ट्रॅफिक सिग्नल तोडले (break traffic signal for 49 times) आहे. यामुळे एक्स बॉयफ्रेंडला चांगलाच मनस्ताप झाला आहे. त्याच्यावर तुरुंगात जायची वेळ आली आहे.

    ही घटना चीनमधील झेझियांग प्रांतातील आहे. येथील एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबतचा बदला घेण्यासाठी त्याच्या ऑडी कारने तब्बल ४९ वेळा ट्रॅफिक सिग्नलचं उल्लंघन केलं आहे. तसेच भरधाव वेगात वाहन चालवले.त्यामुळे त्याविषयीचा गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्वप्रथम संबंधित कारच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत गर्लफ्रेंडनं केलेला प्रकार उघडकीस आला आहे.

    या तरुणीचं नाव लू आहेय तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव चेन असं आहे. याप्रकरणी लू ला असं करण्यामागचं कारण विचारलं असता, तिनं सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडनं अन्य एका मुलीसाठी आपल्यासोबत ब्रेकअप केला होता. याचा बदला घेण्यासाठी ही योजना आखली होती. यासाठी झू नावाच्या व्यक्तीनं लू ला मदत केली होती. झूनेच चेनकडून त्याची कार मागून घेतली होती. त्यानंतर दोघांनी संगनमत करत वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्याचा तडाखा लावला होता.

    ही कार झू कडे दोन रात्रींसाठी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात लूने ह्या कारने शहरात तब्बल ४९ वेळा रेड सिग्नल तोडला आहे. यासाठी लू नं झू ला डेटवर जाण्याचं आमिष दिलं होतं. या प्रकरणी लू आणि झू दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. त्यांना कोणती शिक्षा देण्यात आली, याबाबतची माहिती सध्या उपलब्ध होऊ शकली नाही.