आजपासून चुका करायला सुरुवात, राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्याच दिवशी असं का म्हणाले जो बायडेन?

नवं काही करण्यासाठी सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. प्रयोग करताना चुका होतात. या चुकांमधूनच माणूस शिकत राहतो. मी नवनव्या चुका करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. एकदा झालेल्या चुकांमधून धडे घेऊन अधिक परिणामकारक काम करता येऊ शकतं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन यांनी अत्यंत महत्तवपूर्ण विधान केलंय. आजपासून नव्या चुका करायला आपण सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बायडेन यांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.

नवं काही करण्यासाठी सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. प्रयोग करताना चुका होतात. या चुकांमधूनच माणूस शिकत राहतो. मी नवनव्या चुका करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. एकदा झालेल्या चुकांमधून धडे घेऊन अधिक परिणामकारक काम करता येऊ शकतं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय.

जो बायडेन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

बायडेन यांच्यासह भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरल्या आहेत. बुधवारपासून खऱ्या अर्थान ट्रम्पयुग संपून बायडेनयुग सुरू झालंय.