गुगलने घेतला मोठा निर्णय; अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स बंद

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक अफगाणी अधिकारी देश सोडून निघून गेले. यात अफगाणचे राष्ट्रपती अशरफ घनी यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती घनी आणि अधिकारी देश सोडून निघून गेले असले तरी त्यांचे ई-मेल अकाऊंट्स तालिबान्यांच्या हाती लागू नयेत यासाठी गुगलने सरकारशी निगडीत व्यक्तींचे सर्व ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत.

    काबूल : गुगलने अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पण अफगाणिस्तानाततालिबान्यांकडून अफगाण सरकारच्या माजी अधिकाऱ्यांच्या ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ नये याची खबरदारी म्हणून गुगलने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

    तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक अफगाणी अधिकारी देश सोडून निघून गेले. यात अफगाणचे राष्ट्रपती अशरफ घनी यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती घनी आणि अधिकारी देश सोडून निघून गेले असले तरी त्यांचे ई-मेल अकाऊंट्स तालिबान्यांच्या हाती लागू नयेत यासाठी गुगलने सरकारशी निगडीत व्यक्तींचे सर्व ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत.

    अफगाणिस्तानातील ज्या नागरिकांनी अमेरिकेला आणि अफगाण सरकारला मदत केली अशांचा शोध घेऊन तालिबानकडून त्यांना मारण्यात येत असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून सर्व अफगाण अधिकाऱ्यांचे ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत.

    सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करत आहोत, असे गुगलने स्पष्ट केले आहे. पण हे अकाऊंट्स कायमस्वरुपी बंद करण्याबाबतची कोणतीही स्पष्टता गुगलकडून देण्यात आलेली नाही. तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती घेत आहोत. आणि ई-मेल अकाऊंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली आहेत. अफगाणिस्तान सरकारच्या एका अधिकाऱ्यानं तालिबानकडून ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी तक्रार दिली आहे. त्यानुसारच काही अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत, असे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]