google maps

एखादा पत्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅप्स वापरतो. गुगल मॅप आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाण्यासाठी कमी रहदारीचा रस्ता किंवा शॉर्टकट काय आहे हे सांगतो. मात्र हा शॉर्टकट जीवावरही बेतू शकतो(google map shortcut leads them to death). रशियातील सायबेरियामध्ये असाच काहीसा प्रकार आहे.

मॉस्को : माहिती नसलेल्या ठिकाणी जाताना पत्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅप्स(google maps) वापरतो. गुगल मॅप आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाण्यासाठी कमी रहदारीचा रस्ता किंवा शॉर्ट कट(short cut) काय आहे हे सांगतो. मात्र हा शॉर्टकट जीवावरही बेतू शकतो(google map shortcut leads them to death). रशियातील सायबेरियामध्ये असाच काहीसा प्रकार आहे.

दोन तरुण मुलांना गुगल मॅप्सने दाखवलेल्या शॉर्ट कटमुळे ते अतिशय थंड प्रदेशात पोहोचले. तापमान उणे ५० डिग्रीपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांची तिथून सुटकाच झाली नाही. त्या दोघांपैकी एका १७ वर्षांच्या मुलाचा थंडीमुळे गोठून मृत्यू झाला. दुसरा तरुण गंभीर आजारी आहे.

सर्गे उस्तीनोव्ह आणि वाल्दीस्लाव इस्तोमिन हे दोन मित्र फिरायला म्हणून कारने जगातील सर्वांत थंड हवामानाचं शहर याकुत्सकजवळ (Yakutsk) असलेल्या पोर्ट ऑफ मागादानला (Port of Magadan) निघाले होते. कोलिमा फेडरल हायवेवरून या ठिकाणी जायचं अंतर १९०० किमी आहे तर रोड ऑफ बोन्समार्गे (Road of bones)हे अंतर १७३३ किलोमीटर पडतं. गुगल मॅप्सने हे गणित करून शॉर्ट कट म्हणून रोड ऑफ बोन्समार्गे जाण्याचा मार्ग या दोघांना सुचवला. त्यानुसार हे दोघं शॉर्टकट मारण्याच्या नादात रोड ऑफ बोन्समार्गे निघाले. हा रस्ता निर्जन असून १९७०नंतर फारसा वापरला गेलेला नाही. त्या भागात अतिप्रचंड थंड हवामान असतं आणि इतरही कारणं आहेत.

या दोघांची गाडी या रस्त्यावर आल्यानंतर गाडीचा रेडिएटर बंद पडला. थंडीने गोठून सर्गेचा गाडीतच मृत्यू झाला आणि वाल्दीस्लावचे हातपाय गोठून गेले. त्याचे हातपाय कापावे लागले. तो जिवंत असून हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंजतो आहे. सर्गेचा हायपरथर्मियामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गोठलेल्या स्वरूपात सापडला.