अबब! पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओचा लिलाव ; तब्बल ६ लाखांची लागली बोली

डिजिटल प्रॉपर्टी अंतर्गत हा लिलाव होणार आहे. लिलावासाठी आधारभूत किंमत ४६ लाख ७४ हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. एनएफटी प्लॅटफॉर्मवर ही विक्री होणार आहे. २०१६ साली या व्हिडियोने मला खूप प्रेम आणि सन्मान दिला. विशेष म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि बजरंगी भाईजानच्या संपूर्ण टीमकडून प्रेम मिळाले, अशा शब्दांत चांद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    पाकिस्तानातील पत्रकार चांद नवाब आठवले का? त्यांचा एक व्हिडीओ मध्यंतरी खूप चर्चेत आलेला. ज्यात त्यांनी कराची रेल्वे स्थानकातील लाईव्ह रिपोर्टींगमध्ये धम्माल उडवून दिली होती. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीने चांद नवाबांची भूमिका साकारली. याच मजेशीर व्हिडियोचा आता लिलाव होणार आहे.

    काय आहे व्हिडीओ
    २००८ साली पाकिस्तानच्या कराची रेल्वे स्थानकावर पत्रकार चांद नवाब रिपोर्टींग करत होते. ईदच्या निमित्ताने चांद नवाब यांनी केलेले रिपोर्टींग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि एका रात्रीत चांद नवाब स्टार झाले होते.रिपोर्टींग करताना येणारे प्रवाशांचे व्यत्यय आणि चांद नवाब यांची उडालेली भंबेरी हे सगळं कॅमेऱयात कैद झाले होते.

    त्यांचा याच व्हिडियोचा लिलाव आता करण्यात येणार आहे. डिजिटल प्रॉपर्टी अंतर्गत हा लिलाव होणार आहे. लिलावासाठी आधारभूत किंमत ४६ लाख ७४ हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. एनएफटी प्लॅटफॉर्मवर ही विक्री होणार आहे. २०१६ साली या व्हिडियोने मला खूप प्रेम आणि सन्मान दिला. विशेष म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि बजरंगी भाईजानच्या संपूर्ण टीमकडून प्रेम मिळाले, अशा शब्दांत चांद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.