अबब! १०१ किलो वजनाची पत्नी भांडण झालं म्हणून पतीच्या तोंडावरच बसली ;पुढे झालं असं काही..

शियाच्या नोवोकुझनेत्स्कमध्ये वास्तव्य करणा-या तात्यानाच तिचा पती एदरसोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर तात्यानाने पती एदारला माफी मागायला सांगितली. मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेली १०१ किलो वजनाची पत्नी एदारला जमिनीवर पाडून त्याच्या तोंडावर बसली.

    पती पत्नीमध्ये भांडण होतच असतात, अनेकदा ही भांडण इतकी विकोपाला जातात की घटस्फोटापर्यंत परिस्थिती निर्माण होते. मात्र सायबेरियात अशी एक घटना घडली आहे की पत्नी पतीच्या भांडणांचे पर्यावसन पतीच्या मृत्यूत झाले. माझी माफी माग म्हणत १०१ वजनाची पत्नी पतीच्या तोंडावर बसली. यात पतीचा श्वास गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

    रशियाच्या नोवोकुझनेत्स्कमध्ये वास्तव्य करणा-या तात्यानाच तिचा पती एदरसोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर तात्यानाने पती एदारला माफी मागायला सांगितली. मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेली १०१ किलो वजनाची पत्नी एदारला जमिनीवर पाडून त्याच्या तोंडावर बसली. यात पतीचा श्वासोच्छवास बंद झाल्याने मृत्यू झाला. श्वास कोंडला जात असताना एदार पत्नीकडे गयावया करत होता. तिला उठण्याची विनंती करत होता.मात्र पत्नी अतिशय रागात होती. तिने तोंडावरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे एदारचा श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला. तात्यानाच्या मुलीने सर्वप्रथम तिच्या वडिलांचा मृतदेह पाहिला. मला माझ्या पतीला मारायचे नव्हते. आमच्यात भांडण झाल्याने मी केवळ त्यांना शांत करत होते. वाद सुरू झाल्यावर सतत बोलत होता. तो आरडाओरड करत होता. त्याच तोंड बंद करण्यासाठी मी त्याच्यावर बसले. यामुळे त्याचा जीव जाईल याची मला जराही कल्पना नव्हती, असे पत्नीने सांगितले आहे.