अबब! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा बर्गर ; सोन्याचे पाव असलेल्या या बर्गरची किंमत आहे फक्त साडेचार लाख रुपये

'द गोल्डन बॉय' असे या बर्गरला नाव देण्यात आले आहे. आता तुम्ही हाही विचार कराल की या बर्गरच्या किमतीत महागडे रोलेक्सचे घडय़ाळ खरेदी करता येऊ शकते. तर तेही खरे आहे. मात्र हे बर्गर बनवणाऱ्याचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते.

    काही गोष्टींच्या किमंती ऐकूनच धक्का बसायला होते. असाच एक धक्का तुम्हाला नेदरलॅंडमधील बर्गरची किमंत ऐकून बसेल. नेदरलॅंडमधील वुथुइजेन शहरातील डी डॉल्टन्स हे फूड आउटलेटने जगातील सर्वात महागडा बर्गर लॉंच केला आहे. या बर्गरची किंमत चक्क ४ लाख ४७ हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

    ‘द गोल्डन बॉय’ असे या बर्गरला नाव देण्यात आले आहे. आता तुम्ही हाही विचार कराल की या बर्गरच्या किमतीत महागडे रोलेक्सचे घडय़ाळ खरेदी करता येऊ शकते. तर तेही खरे आहे. मात्र हे बर्गर बनवणाऱ्याचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाल्याचे आउटलेटचे मालक रॉबर्ट जेन डी सांगतात. युरो न्यूजच्या रिपोर्टनुसार या बर्गरच्या बनमध्ये सोन्याचे पान आहे. याव्यतिरिक्त मशरूम, स्टर्जियन माशाची अविकसित अंडी, बदकाच्या अंडय़ातील बलक, डोम पेरीग्नॉन शॅम्पेन याचा वापर बर्गर बनविण्यासाठी करण्यात आला आहे.