Grandma, 80, Marries Her 35-Year-Old Lover From Egypt Whom She Met On Facebook

एका टीव्ही शोमध्येही काही महिन्यांपूर्वी ही जोडी झळकली होती. यानंतर त्यांची अनोखी लव्ह स्टोरी चर्चेत आली. यावेळी आयरिस यांनी आपल्या काही खाजगी गोष्टी शेअर केल्या.  लग्नानंतर आयरिस यांची मुलं आणि नातवंडे, पतवंडेही त्यांच्याशी बोलायला तयार नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी संबंध तोडले आहेत.

ब्रिटन : ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन…. प्रसिद्ध शायर जगजीत सिंह यांच्या गझलेला शोभेल असं एक जोडपं ब्रिटनमध्ये पहायला मिळाले आहे. ८० वर्षांच्या आजीबाईंचा ३५ वर्षांच्या तरुणाशी विवाह झाला आहे.

आयरिस जोन्स या ८० वर्षांच्या या आजींचं मोहम्मद इब्राहिम या ३५ वर्षांच्या तरुणाशी लग्न झाले आहे. आयरिस ही ब्रिटनची रहिवासी आहे तर इब्राहिम हा इजिप्तचा नागरिक आहे. आयरिस आणि इब्राहिम यांच्या वयात ४५ वर्षांचं अंतर आहे.

फेसबुकवर या दोघांची ओळख झाली. मग, फोनवर बातचीत सुरु झाली. नंतर हळूहळू त्यांच प्रेम फुलू लगालं. सर्वप्रथम इब्राहिमने आयरिस समोर प्रेमाची कबुली दिली. मग, इब्राहिमला भेटण्यासाठी आयरिस थेट इजिप्तला पोहचल्या.

काही काळाने इजिप्त मध्येच या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांचा हा विवाह सोहळा अतिशय खागजी होता. मात्र, लग्नापूर्वी आयरिस यांनी धर्मांतर करत इस्लाम स्वीकारला.

मला फक्त आयरिसचं प्रेम आणि सोबत हवी आहे. मनापासून तिच्याविषयी प्रेमभावना निर्माण झाली. तिच्याशी लग्न करुन आनंदी असल्याची प्रतिक्रिया इब्राहिमने दिली.