‘हा’ अफगाणिस्तानचा नवीन सरंक्षणमंत्री आहे, जगातील सर्वाधिक क्रूर दहशतवादी

अब्दुल कय्यूम झाकीर हा तालिबांन संस्थापक मुल्ला उमरचा सर्वात जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता.

    काबूल: अफगाणिस्तान(Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी (Taliban) सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे. जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी व शांतता चर्चेला विरोध करणाऱ्या मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर (Abdul Qayyum Zakir) यांची अफगाणिस्तानचे अंतरिम संरक्षण मंत्री (New Defense Minister of Afghanistan) म्हणून नेमणूक करण्यात आली केली आहे.

    अब्दुल कय्यूम झाकीर हा तालिबांन संस्थापक मुल्ला उमरचा सर्वात जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. या हल्ल्यानंतर २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने त्याला पकडले होते आणि २००७पर्यंत ग्वांतानामो खाडीच्या तुरुंगात ठेवले होते. तालिबानमधील सर्वाधिक धोकादायक व क्रूर दहशतवाद्यांमध्ये मुल्ला अब्दुलची गणना केली जाते.

    अफगाणिस्तानची वृत्तसंस्था पझवोकच्या म्हणण्यानुसार, तालिबानने दहशतवादी गुल आगाचे नाव कार्यकारी अर्थमंत्री म्हणून तर सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री म्हणून घोषित केले आहे.