बांगलादेशात दुर्गापूजा महोत्सवादरम्यान दंगली, मंदिरात तोडफोड

ईशनिंदाच्या आरोपानंतर येथून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील कमीलामध्ये एक स्थानिक मंदिर सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर केंद्रबिंदू ठरले. यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले.

    ढाका (Dhaka) : बांगलादेशात दुर्गोत्सवादरम्यान (Durgotsavada in Bangladesh) काही अज्ञात कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या पूजा मंडपांवर हल्ला (attacked Hindu worship pavilions) केला आणि मूर्तींची तोडफोड (vandalize idols) केली.

    यानंतर सरकारने बांगलादेशातील 22 जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर बांगलादेशात भडकलेल्या दंगलीत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत.

    ईशनिंदाच्या आरोपानंतर येथून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील कमीलामध्ये एक स्थानिक मंदिर सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर केंद्रबिंदू ठरले. यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. चांदपूरच्या हाजीगंज, चटगावच्या बांसखली आणि कॉक्स बाजारच्या पेकुआमध्ये हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी दुर्गा पूजा मंडपांवरही हल्ला करण्यात आला. कमीला येथे पोलिस आणि जमावात चांगलीच चकमक उडाली. यानंतर 22 जिल्ह्यांत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे.