धरतीचा विनाश किंवा मनुष्य प्राण्याचा अंत होण्याची तारीख काय असेल? Harvard University च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा…

हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक एवी लोएब (Avi Loeb) यांनी एका व्याखानादरम्यान, जगाचं अस्तित्व कधीपर्यंत असेल अशी विचारणा संशोधकांकडे केली आहे. धरतीचा विनाश किंवा मनुष्य प्राण्याचा अंत होण्याची तारीख काय असेल? अशी विचारणा करताना ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) रोखण्यासाठी काम आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली : हिंदू पौराणिक दंतकथांनुसार जगाची निर्मिती आणि अंत ईश्वराच्या हाती आहे. भगवान विष्णूने स्वत: अवतार घेऊन धरती आणि मनुष्यजातीचा उद्धार केल्याची कथा सांगितली जाते. असाच काहीसा संदर्भ प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये आपआपल्या देवतांशी संलग्न आहे.मनुष्याच्या जन्मापासून जगाची निर्मिती आणि विनाश याबाबत नेहमी चर्चेचा उहापोह होत असतो. पृथ्वीचा विनाश कधी होणार किंवा जगबुडी कधी येणार हा सातत्याने चघळला जाणारा विषय.

    दोन्हीमध्ये जगाचा विनाश या विषयाबाबत आपआपल्या पातळीवर, तथ्यांवर विश्लेषण केलं जात आहे. सिनेमांमधून किंवा प्राचीन ग्रंथांमध्येही धरतीच्या विनाशाबाबत भाष्य केलं जातं.

    हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी

    जगातील प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठानेही आता जगाच्या विनाशावर नवा उहापोह घडवला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक एवी लोएब (Avi Loeb) यांनी एका व्याखानादरम्यान, जगाचं अस्तित्व कधीपर्यंत असेल अशी विचारणा संशोधकांकडे केली आहे. धरतीचा विनाश किंवा मनुष्य प्राण्याचा अंत होण्याची तारीख काय असेल? अशी विचारणा करताना ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) रोखण्यासाठी काम आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    एवी लोएब यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसाने ज्यापद्धतीने पृथ्वीची स्थिती केली आहे, त्यावरुन अंदाज येतो की, माणूस आता जास्त दिवस धरतीवर राहू शकणार नाही. काहीच पिढ्यांमध्ये पृथ्वीवर ही वेळ आली आहे, इतकी वाईट अवस्था झाली आहे की, लोकांना आता अंतराळात जाऊन राहावं लागेल. सर्वाधिक धोका तांत्रिक आपत्तीचा (Technological Catastrophe) आहे.