corona vaccine update serum institute of india has now prepared 60 million vaccine dose

लंडनमध्ये(London)  फायजर लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग(corona spread) झाला आहे. डॉक्टर यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत.

फायजरची कोरोना लस(corona vaccination) उपयोगी नाही का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण लंडनमध्ये(London)  फायजर लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग(corona spread) झाला आहे. डेविड लॉन्गडन असं या आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव आहे. डेविड साऊथ वेल्समधील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये डेविड काम करतो. डेविडने ८ डिसेंबर रोजी फायजर लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही एका महिन्यात डेविडचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

डेविडला फायजरच्या लसीचा दुसरा डोस पाच जानेवारी रोजी देणं अपेक्षित होतं. मात्र सरकारने देशातील जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यासाठी पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याची तारीख पुढे ढकलली. सध्या डेविडला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही त्याला कोरोना कसा झाला याचा शोध डॉक्टर घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ,डेविडची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.