हृदयद्रावक! ‘आम्हाला वाचवा, तालिबानी येत आहेत…’ ; अफगाणी महिलांचा काबूल विमानतळावर आक्रोश

'आम्हाला वाचवा... तालिबानी येत आहेत...' असं म्हणत अफगाण महिला मदतीसाठी विनंती करत आहेत. सैनिक महिलांची असहाय्यता पाहत आहेत, पण इच्छा असली तरी ते काहीही करू शकत नाहीत.

    काबूल :  अफगाणिस्तानमध्ये( Afghanistan)आता दहशतवादी संघटना तालिबानने (Taliban) सत्ता आणि देश काबीज केला आहे.  येथे मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण होण्याची शक्यता असल्याने येथील अनेक नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तेथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. पूर्वी जेव्हा तालिबानी सत्तेत होते तेव्हा त्यांनी महिलांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यांना नोकरी आणि शिक्षणापासून वंचित ठेवले. तसेच घरा बाहेर पडण्यावर देखील सक्ती केली. महिला फक्त घरातील नवरा , मुलगा आणि वडील या पुरूषांसोबतच बाहेर फिरू शकतील असा फतवा तालिबानने काढला होता.

    सध्या तालिबानने संपूर्ण अफगाण स्वतःच्या अंमलाखाली आणले आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर आता तेथील महिला आक्रोश करत आहेत. देशातून सुटका करण्यासाठी अफगाण नागरिकांनी   काबूल विमानतळावर एकच गर्दी केली. तेव्हा विमानतळावर असलेल्या महिलांनी अमेरिकन सैन्याला जीवन वाचविण्यासाठी मागणी केली.’आम्हाला वाचवा… तालिबानी येत आहेत…’ असं म्हणत अफगाण महिला मदतीसाठी विनंती करत आहेत. सैनिक महिलांची असहाय्यता पाहत आहेत, पण इच्छा असली तरी ते काहीही करू शकत नाहीत. कारण प्रत्येक अफगाणीला सोबत घेणे कोणालाही शक्य नाही. शिवाय विमानतळाबाहेर देखील तालिबानी आहेत.