कॅनडामध्ये उष्णतेने १०,००० वर्षांचा विक्रम मोडला, उष्माघाताने एका दिवसात २३० जण दगावले

कॅनडामधील उष्णतेने १०,००० वर्षाचा विक्रम मोडला आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात, पारा ४९.४४ डिग्री सेल्सियस पर्यंत नोंदविला गेला. मोठ्या प्रमाणात झालेल्या या उष्घाताने एकाच दिवसात २३० जण दगावले आहेत.

  क्यूबेक : कॅनडात उष्णतेने १०,००० वर्षाचा विक्रम मोडला आहे. ब्रिटीश कोलंबिया प्रांतात, पारा ४९.४४ डिग्री सेल्सियस पर्यंत नोंदविला गेला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या उष्घाताने एकाच दिवसात २३० जण दगावले आहेत. ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर जॉन हॉर्गन यांनी मृत्यूची पुष्टी करत म्हटले आहे की, अत्यधिक तापमानामुळे त्याच्या राज्यात २३० लोकांचा मृत्यू झाला आहे.

  तापमान ४९ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले

  या रविवारीपूर्वी कॅनडामधील तापमान ११३ डिग्री फॅरेनहाइट किंवा ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त कधी नव्हते. हे तापमान विक्रम सन १९३७ मध्ये करण्यात आले होते. परंतु यावेळी १० हजार वर्षात पुन्हा एकदा उष्णतेचा असाच परिणाम झाल्यामुळे तापमानही ४९ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. केवळ व्हँकुव्हरमध्ये उष्णतेमुळे ६५ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  कॅनडाच्या हवामान खात्याने सांगितले उष्णतेचे दाहक स्वरुप

  या तीव्र उष्णतेचे वर्णन शब्दात करता येणं अवघड असल्याचे कॅनडाच्या हवामान विभागाने सांगितले.ब्रिटिश कोलंबियाची नोंद आतापर्यंतच्या लास वेगासमधील सर्वाधिक तापमानापेक्षा जास्त आहे असेही कॅनडाच्या हवामान विभागाने नमूद केले. कॅनडा ते अमेरिकेपर्यंत ही उष्णतेची लाट विस्तारलेली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि ओरेगॉन येथेही विक्रमी तापमानाचा अनुभव घेतला जात आहे.

  उष्णतेचा आगडोंब म्हणजे काय, ज्याने माजविलाय हाहाकार

  कॅनडामध्ये गेल्या १० हजार वर्षात पहिल्यांदाच जेव्हा तापमानाने उष्णता वाढवून कहर केला. यामुळे वातावरणात उष्णता अधिक पसरते आणि दाब आणि हवेच्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो. गरम हवेचा ढीग उच्च दाब क्षेत्रात अडकतो. यामुळे आजूबाजूची हवा आणखी गरम होते. यामुळे बाहेरील हवा आत येऊ देत नाही आणि आतल्या हवेला उबदार ठेवते.

  १०,००० वर्षांत प्रथमच घडलाय हा प्रकार

  अमेरिकन मीडिया सीबीएस हवामानशास्त्रज्ञ जेफ बेरारदेल्ली म्हणाले की, जर आपण आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर तापमान वाढीच्या घटना १०,००० वर्षांनंतर एकदाच घडतात. आपण गेल्या १०,००० वर्षांपासून एखाद्या ठिकाणी राहत असल्यास, उष्णतेच्या तापमान वाढीचा परिणाम आपण एकदाच अनुभवू शकतो. बर्नबी रॉयल कॅनेडियन माऊंट पोलिसांचा कॅप्टन माइक कलांज म्हणाला की, गेल्या २४ तासांत त्याला २५ मृत्यू झाल्याचे कॉल आले.

  आपत्कालीन परिस्थितीतच मदत घेण्याचे पोलिसांनी केले आवाहन

  हवामान खात्याने सांगितले आहे की, बुधवारी ब्रिटिश कोलंबिया, युकोन आणि वायव्य प्रांतातील काही भागात विक्रमी उष्णतेच्या लाटा कमी होऊ शकतात. तथापि, प्रीरी प्रांतात उष्णता कायम राहील. व्हँकुव्हरमध्ये पोलिस विभागाने असे म्हटले आहे की त्यांनी डझनभर अधिकारी नियुक्त केले आहेत आणि लोकांना आपत्कालीन परिस्थितीसाठी फक्त ९११ वर कॉल करण्यास सांगितले आहे. उष्णतेने झालेल्या मृत्यूमुळे रुग्णालयांच्या मुख्य स्त्रोतांवर ताण आल्यामुळे लोकांना मदत करणे कठीण झाले आहे.

  heat wave in canada 233 people die in 24 hours