अमेरिकेत उष्णतेच्या लाटा ; पश्‍चिम अमेरिकेत भडकला वणवा

जुलै १९१३ मध्ये येथील तापमान ५७ अंश सेल्शियस इतके नोंदवले गेले होते. तो दिवस पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस असल्याचे मानले जात होते.कॅलिफोर्नियाच्या वायव्येकडे ३०० मैल अंतरावरील वाळवंटी प्रदेशात नेवाडा प्रांताच्या सीमेजवळ हा वणवा भडकला आहे. सिएरा नवादा येथसर्यंत हा वणवा पोहोचण्याची कोणतीही शक्‍यता दिसत नव्हती.

    सॅन फ्रान्सिस्को : ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम आता अमेरिकेत बघायला मिळत आहेत. अमेरिकेच्या पश्‍चिमेकडील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे वणवा भडकला आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील काही भागांमध्ये हा वणवा भडकला आहे आणि ही आग विझवण्यासाठी फायर फायटर झगडत आहेत.

    मोठी वनसंपदा जाळून खाक
    या वणव्यामुळे मोठ्या वनसंपदेचे नुकसान झाले असून , ही आग लवकर आटोक्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे राख रांगोळी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अग्नेय कॅलिफोर्नियातल्या डेथ व्हॅलीमधील मोजावी डेजर्टमधील तापमान शनिवारी ५३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र आदल्याच दिवसापेक्षा तापमान यापेक्षा कमी होते. आदल्या दिवशी तापमान ५४ अंश सेल्शियस इतके होते, ही एक आश्‍चर्याची गोष्ट आहे.

    जुलै १९१३ मध्ये येथील तापमान ५७ अंश सेल्शियस इतके नोंदवले गेले होते. तो दिवस पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस असल्याचे मानले जात होते.कॅलिफोर्नियाच्या वायव्येकडे ३०० मैल अंतरावरील वाळवंटी प्रदेशात नेवाडा प्रांताच्या सीमेजवळ हा वणवा भडकला आहे. सिएरा नवादा येथसर्यंत हा वणवा पोहोचण्याची कोणतीही शक्‍यता दिसत नव्हती. मात्र शनिवारी संध्याकाळी या वणव्याने रौद्र रुप धारण केले आणि तो राज्यांच्या सीमा ओलांडून पसरू लागला. त्यामुळे नवाडातील वॉशॉ कौंटीतील मालमत्तांना धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत हा वणवा ८६चौरस मैलांपर्यंत पसरला आहे.