पाकिस्तानी संसदेत चिनी कॅमेरे? इम्रान खान यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

पाकिस्तानच्या संसदेत अध्यक्ष आणि उपसभापतींच्या निवडणुका सुरू होत्या. त्यावेळी मतदान केंद्रांवर गुप्त कॅमेरे आढळल्याची तक्रार सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि मंत्री शिबली फराज यांनी केली. आता सरकारमधील मंत्रीच असं म्हणत असल्याचं पाहून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि इम्रान खान सरकारवर जोरदार टीका केली. चीननं षडयंत्र करत पाकिस्तानी मतदान प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आरोप पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी केला.

    एका धक्कादायक घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडालीय. पाकिस्तानच्या संसदेत चक्क गुप्त कॅमेरा बसवल्याचे निष्पन्न झाले आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चांगलेच हादरले. संसदेतील मतदानादरम्यान एका खासदाराच्या नजरेला हा कॅमेरा पडला आणि त्यानंतर या छुप्या कॅमेऱ्याचं रहस्य छुपं राहिलं नाही.

    पाकिस्तानच्या संसदेत अध्यक्ष आणि उपसभापतींच्या निवडणुका सुरू होत्या. त्यावेळी मतदान केंद्रांवर गुप्त कॅमेरे आढळल्याची तक्रार सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि मंत्री शिबली फराज यांनी केली. आता सरकारमधील मंत्रीच असं म्हणत असल्याचं पाहून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि इम्रान खान सरकारवर जोरदार टीका केली. चीननं षडयंत्र करत पाकिस्तानी मतदान प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आरोप पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी केला.

    पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सिनेट सदस्य मुस्तफा खोकर यांनीदेखील मतदान केंद्रावर कॅमेरा बसवल्याची तक्रार केली. त्यानंतर अशाच प्रकारची तक्रार सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील खासदारांनीदेखील केली. त्यामुळे हा कॅमेरा सत्ताधारी पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवला की हे बाहेरच्या देशानं केलेलं कारस्थान आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

    गुप्त बॅलेट पद्धतीनं पाकिस्तानी लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती यांच्या निवडीसाठी मतदान पार पडतं. मात्र आता हे गुप्त मतदान गुप्त राहिलं नसल्याचं उघड झालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर या प्रकाराची अंतिम जबाबदारी आलीय. हा प्रकार चीनचं कारस्थान असल्याचं सत्ताधारी पक्षानं सांगितलंय. मात्र चीननं नियंत्रण पाकिस्तानच्या संसदेपर्यंत पोहोचलंय हे पंतप्रधान इम्रान खान मान्य करत आहेत काय, असा सवाल विरोधी पक्षांनी केलाय.