पाकिस्तानातून हिंदु आणि ख्रिश्चन मुलींची चीनमध्ये विक्री, अल्पसंख्याकांचे अतोनात हाल

पाकिस्तानमधून चीनला हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची विक्री होत असल्याची बाब एका अमेरिकी अधिकाऱ्यानं उजेडात आणलीय. अमेरिकेच्या जागतिक धार्मिक स्वातंत्र्य विभागातील वरीष्ठ अधिकारी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील हिंदु आणि ख्रिश्चन मुलींना चिनी लोकांशी लग्न करण्यास भाग पाडलं जात आहे.

पाकिस्तानात लोकशाही प्रक्रियेची पुरती धुळधाळ उडाली असून तिथल्या अल्पसंख्याकांच्या पदरी हलाखीचं आयुष्य येत असल्याचं चित्र आहे. चीनदेखील आता पाकिस्तानातील या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं समोर आलंय.

पाकिस्तानमधून चीनला हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची विक्री होत असल्याची बाब एका अमेरिकी अधिकाऱ्यानं उजेडात आणलीय. अमेरिकेच्या जागतिक धार्मिक स्वातंत्र्य विभागातील वरीष्ठ अधिकारी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील हिंदु आणि ख्रिश्चन मुलींना चिनी लोकांशी लग्न करण्यास भाग पाडलं जात आहे.

अमेरिकेनं काही दिवसांपूर्वीच अल्पसंख्याकांवर अन्याय करणाऱ्या देशांची यादी तयार केली होती. या यादीत पाकिस्तान आणि चीन या दोन्हींचा समावेश आहे. चीनमध्ये मुस्लिमांवर तर पाकिस्तानात हिंदु आणि ख्रिश्चन समुदायावर अन्याय होत असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. चीनमधील एक मूल पॉलिसीमुळेही अनेक चिनी नागरिक पाकिस्तानातून महिला आणतात आणि त्यांना दासी बनवून ठेवतात, अशी माहिती समोर आलीय.