जपानमध्ये ऐतिहासिक शस्त्रक्रिया, पती आणि मुलाच्या फुफ्फुसाचे तुकडे वापरून केले महिलेचे फुफ्फुस प्रत्यारोपण

कोरोना विषाणू हा मुख्यत्वे फुफ्फुसावर परिणाम करतो. अनेकांची फुफ्फुसे या आजारामुळे निकामी होतात, तर अनेकांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी होते. जपानमध्ये कोरोनामुळे फुफ्फुसे निकामी झालेल्या एका महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सामान्यतः एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीचे फुफ्फुस काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्यात येते. प्रत्यारोपणासाठी पारंपरिकरित्या हीच पद्धत वापरण्यात येते. मात्र जपानमध्ये जिवंत व्यक्तींच्या फुफ्फुसांचा वापर करत  एका महिलेला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आलंय. 

    कोरोनाने जगात धुमाकूळ घातलाय. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला असून कोट्यवधी नागरिकांचे प्राण गेलेत. मात्र या संकटकाळात काही नवे प्रयोगदेखील होत आहेत. जपानमध्ये नुकताच असा एक यशस्वी प्रयोग झालाय.

    कोरोना विषाणू हा मुख्यत्वे फुफ्फुसावर परिणाम करतो. अनेकांची फुफ्फुसे या आजारामुळे निकामी होतात, तर अनेकांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी होते. जपानमध्ये कोरोनामुळे फुफ्फुसे निकामी झालेल्या एका महिलेवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सामान्यतः एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीचे फुफ्फुस काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्यात येते. प्रत्यारोपणासाठी पारंपरिकरित्या हीच पद्धत वापरण्यात येते. मात्र जपानमध्ये जिवंत व्यक्तींच्या फुफ्फुसांचा वापर करत  एका महिलेला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आलंय.

    जपानमधील एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात तिचे फुफ्फुस निकामी झाले. या महिलेच्या पतीने आणि मुलाने आपल्या फुफ्फुसाचा एक एक तुकडा देण्याची तयारी दाखवली. डॉक्टरांनी या दोघांच्या फुफ्फुसांचे तुकडे वापरून या महिलेचे फुफ्फुस प्रत्यारोपण केले आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. वैद्यकशास्त्रात हा एक नवा चमत्कार मानला जातोय.

    या महिलेची प्रकृती सुधारत असून थोड्याच दिवसात तिला डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी सांगितलंय. जगभरात सध्या कोट्यवधी रुग्ण फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. फुफ्फुसे मिळत नसल्यामुळे त्यांच्या शस्त्रक्रिया करता येत नाहीत. मात्र या प्रकारे शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याचं सिद्ध झाल्यामुळे नातेवाईक आणि मित्रांच्या फुफ्फुसांचा काही भाग वापरून शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचं यातून सिद्ध झालंय. कोट्यवधी रुग्णांसाठी हा आशेचा किरण मानला जातोय.