काय सांगताय..! क्रोएशियामध्ये अवघ्या १२ रूपयाला होत आहे घरांची विक्री, जाणून घ्या काय आहे ही शानदार ऑफर

क्रोएशियामधील लेग्राड शहर अशा प्रकारची वस्ती किंवा जागा आहे. जेथे देशातील सर्वात जास्त लोकसंख्या येथे राहत होती. परंतु जवळपास १०० वर्षापूर्वी ऑस्ट्रो आणि हंगरियनचं साम्राज्य ढासाळल्यानंतर येथील लोकसंख्येत सतत घट होताना दिसत आहे. 

  जग्रेब: क्रोएशियाच्या (Croatia) उत्तरेला असलेल्या लेग्राड (Legrad) या शहरातील प्रशासनासमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. ट्रान्सपोर्टचे नेटवर्क कमी झाल्यामुळे येथील नागरिक आपली घरं सोडून जात आहेत. तसेच आपल्या घरांना एक महज आणि १२ रूपयांना विकायला मजबूर होत आहेत.

  लेग्राड शहरातील लोकसंख्येत घट होण्याचं काय आहे कारण ?

  क्रोएशियामधील लेग्राड शहर अशा प्रकारची वस्ती किंवा जागा आहे. जेथे देशातील सर्वात जास्त लोकसंख्या येथे राहत होती. परंतु जवळपास १०० वर्षापूर्वी ऑस्ट्रो आणि हंगरियनचं साम्राज्य ढासाळल्यानंतर येथील लोकसंख्येत सतत घट होताना दिसत आहे.

  लेग्राडचे महापौर इवान साबोलिक यांनी सांगितलं की, जेव्हापासून आमचे शहर एक सीमावर्ती शहर बनले आहे. तेव्हापासून येथील लोकसंख्येत घट होताना सतत दिसत आहे. लेग्राड शहराची सीमा हंगरीने जोडली आहे.

  असं आहे लेग्राड शहराचे दृश्य

  लेग्राड शहरात हिरवळ आाणि चारही दिशांना घटदाट जंगल आहे. या शहरात २ हजार २५० लोक राहतात. ७० वर्षांपूर्वीपेक्षा लेग्राड शहरात आजच्या दिवसात शहराची लोकसंख्या दुप्पट आहे. येथील महापौरांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी १९ घरं रिकामी करण्यात आले होते. या घरांची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. एका घराची किंमत फक्त १ कुना किंवा १२ रूपये इतकी आहे. आतापर्यंत १७ घरांची विक्री करण्यात आली आहे.