लिबियात अन्न पाण्यासाठी महिलांना गार्डसोबत करावा लागतोय सेक्स, गरोदर महिलांवरही होतायेत बलात्कार

अमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. नंतर या संस्थेच्या प्रतिनिधींनी या छावण्यांतून पळून आलेल्या किंवा तिथून फोनवर बोलू शकणाऱ्या अशा ५३ जणांशी संवाद साधला. त्यामध्ये या छावण्यांतील भयानक चित्र जगासमोर आलं आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  ब्रसेल्स : लिबियामधील (Libya) एकूणच परिस्थिती भयानक आहे. तिथल्या निर्वासितांच्या छावण्यांत नायजेरिया, सोमालिया आणि सीरियाचे अनेक नागरिक आणि निर्वासित आहेत. त्यांना तिथून सुटणं शक्य होत नाहीए आणि तिथं त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. पुरुष आणि महिलांचा प्रचंड छळ (Harassment of Men and women ) केला जात असून त्याबद्दल बातम्याही बाहेर येत नाहीत.

  अमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. नंतर या संस्थेच्या प्रतिनिधींनी या छावण्यांतून पळून आलेल्या किंवा तिथून फोनवर बोलू शकणाऱ्या अशा ५३ जणांशी संवाद साधला. त्यामध्ये या छावण्यांतील भयानक चित्र जगासमोर आलं आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  लिबियामध्ये असलेल्या छावण्यांचं (Detention Camps in Libya) रूपांतर जणू छळ छावण्यांमध्ये झालं आहे. तिथं सर्रास मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. इथे असलेले गार्ड तिथं असलेल्या निर्वासितांना मारत आहेत आणि महिलांचं शारीरिक शोषणही करत आहेत. त्यामुळे इथं असलेले नागरिक अजिबात सुरक्षित नाहीत. इथं जर एखाद्या महिलेला प्यायला स्वच्छ पाणी हवं असेल तर तिथले गार्ड (Guard) तिला सेक्स करायला भाग पाडतात अशी परिस्थिती आहे. अमनेस्टी इंटरनॅशनलच्या वृत्तामुळे इथलं काळं सत्य जगासमोर आलं आहे.

  अमनेस्टी इंटरनेशनलनी (Amnesty International) सांगितलं की, लिबियातील छावण्यांत असलेल्या निर्वासितांना जबरदस्तीने परपुरुषाशी सेक्स करावा लागतोय. जर एखाद्या महिलेला त्या छावण्यांतून सुटका करून घ्यायची असेल आणि तिनी गार्डला सांगितलं तर तो तिला त्याच्याबरोबर सेक्स (Sex Compulsion) करायला सांगतो. त्यानंतरच मुक्त करतो असं सांगितलं जातं. ही माहिती एका निर्वासित महिलेनेच अमनेस्टीला दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

  ही आहे काळी बाजू

  भूमध्य सागर परिसरातील निर्वासितांशी संबंधित हा अमनेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल आहे. हे निर्वासित २०२० आणि २०२१ मध्ये लिबियात थांबले त्यांना या छावण्यांत राहायला लागतंय. या छावण्यांत प्रवासी नागरिकही आहेत. या निर्वासित छावण्यांवर लिबियाच्या गृह मंत्रालयाचं नियंत्रण असूनही तिथली परिस्थिती बिघडत आहे. पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनीही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

  एका महिलेनी अमनेस्टीला सांगितलं, या छावणीत गार्ड म्हणतात स्वच्छ पाणी आणि झोपायला व्यवस्थित गादी हवी असेल तर माझ्याशी सेक्स कर. त्यानंतर मी तुला या ठिकाणावरून मुक्त करेन. दुसऱ्या एका महिलेनी सांगितलं की, या छावण्यांत राहणाऱ्या महिलांवर बलात्कार केले जातात. त्यांच्याशी जबरदस्तीने सेक्स केलं जातं. पण या महिलांना अन्न पाण्यासाठी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गरोदर महिलांवरही गार्ड बलात्कार करतात. पुरुषांना अपमानित करण्यासाठी केवळ अंडरपँटवर त्यांना ठेवलं जातं. अमनेस्टीने या छावण्यांतून पळून आलेल्या किंवा फोनवर बोलू शकणाऱ्या ५३ जणांशी संवाद साधला त्यांचं वय १४ ते ५० दरम्यान होतं.

  horrific sexual violence with women for clean water and food says amnesty international nrvb