धक्कादायक! सूप करायचं म्हणून कापली होती सापाची मुंडी, पण २० मिनिटानंतर तिनेच घेतला शेफचा जीव

४४ वर्षीय लिन सन आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेले. जिथे अचानक त्याला स्वयंपाकघरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, आत काय चालले आहे ते आम्हाला माहित नव्हते. पण किचन मधून किंचाळण्याचा आवाज येत होता. तेथे चेंगराचेंगरी झाली. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले.

  जिवंत साप हा खूपच धोकादायक असतो. पण दक्षिण चीनमधून असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे लोकांना धडकीच भरेल. वास्तविक, येथे एक शेफ कोबरा सापाचं सूप तयार करत होता. त्यासाठी शेफने सापाचे तुकडे करून त्याची मुंडी वेगळी ठेवली होती. जवळपास २० मिनिटांनंतर कोबराची कापलेली मुंडी उचलली तर तिने शेफला चावा घेतला, यामुळे त्या शेफचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट नुसार, ग्वांगडोंग प्रांतातील फोशान सिटीतील शेफ पेंग फॅन इंडोचाइनीज स्पिटिंग सापाच्या मासांपासून सूप तयार करत होते. चीनमध्ये सापांपासून तयार केलेली डिश आणि सूप अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्यावर लोक यथेच्छ ताव मारतात.

  काय आहे प्रकरण?

  मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा शेफने सूप बनवण्याची तयारी केली तेव्हा त्याने कोब्रा साप कापला. तथापि, सूप तयार केल्याच्या सुमारे २० मिनिटांनंतर, जेव्हा त्याने किचन साफ करताना सापाचे कापलेले तुकड्यांचा कचरा फेकण्यासाठी उचलला, तेव्हा त्याला धक्का बसला, कारण कापलेल्या डोक्यात काही जीव शिल्लक होता. त्यानेच शेफला चावा घेतला होता.

  किचनमधून आला ओरडण्याचा आवाज

  ४४ वर्षीय लिन सन आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेले. जिथे अचानक त्याला स्वयंपाकघरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, आत काय चालले आहे ते आम्हाला माहित नव्हते. पण किचन मधून किंचाळण्याचा आवाज येत होता. तेथे चेंगराचेंगरी झाली. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. पण तोपर्यंत शेफ मेला होता. तथापि, हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

  धोकादायक असते कोब्राचे विष

  पोलिसांनी सांगितले की, ‘हे एक अतिशय असामान्य प्रकरण आहे, जो फक्त एक अपघात आहे असे वाटते. शेफला वाचवण्यासाठी काहीच करता आले नाही, फक्त डॉक्टर त्याला मदत करू शकले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साप आणि इतर सरपटणारे प्राणी मारल्यानंतरही एक तास हलू शकतात. कोब्राचे विष धोकादायक आहे. त्यात न्यूरोटॉक्सिन्स असतात, जे ३० मिनिटांच्या आत मारू किंवा अपंग करू शकतात.