दारु प्यायल्यावर इंग्रजी न अडखळता फाडफाड कसं बोलता येत? ; ब्रिटनमध्ये झालं संशोधन

लोक दारुच्या नशेत सहजपणे डच भाषेत बोलत होते. या लोकांना थोड्या प्रमाणात अल्कोहल देण्यात आलं होतं. लोकांना कमी प्रमाणात दारु प्यायला दिल्यानंतर असे निष्कर्ष समोर आले आहेत. लोकांना त्यांची मातृभाषा वगळता इतर भाषेमध्ये बोलणं सर्वसामान्यपणे कठीण असतं. दारु प्यायल्यानं जरी एखाद्या भाषेचं अपुरं ज्ञान असलं तरी ती भाषा येत असल्याच्या अविर्भावात व्यक्ती नशेमुळे बोलते. मात्र दारुमुळे आरोग्यावर दुष्परिणामही होतात. स्मरणशक्ती आणि एकाग्रता यावर वाईट परिणाम होतो.

    लंडन : ब्रिटिशमध्ये एक गमतीशीर आणि तितकेच महत्वपूर्ण संशोधन झाले आहे. संशोधनाचा विषय दारू आणि इंग्रजी बोलण्याचा काही संबंध आहे का असा होता. तर या संशोधनात एखादी व्यक्ती नशेत असते तेव्हा दारु न पिता जितकं इंग्लिश बोलू शकतो त्यापेक्षा सहज बोलतो असं दिसतं. संशोधनातून अशी माहिती समोर आलीय की दारुच्या नशेत इतर भाषा शिकताना मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, ब्रिटनमधील एका कॉलेजने आणि नेदरलँडसच्या युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिचमध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं.

    सर्वसाधारणपणे लोकांना दारुच्या नशेत काय बोलतोय किंवा काय करत आहोत याच भान राहत नाही. मात्र अनेकांनी हेही पाहिलं असेल की काही लोक दारू प्यायल्यावर इंग्रजी फाडफाड बोलायला सुरुवात करातात. ज्यांची इंग्रजी म्हणावी तितकी चांगली नसते आणि बोलताना अडखळतात ते लोक मात्र नशेत धडाधड इंग्रजी बोलत सुटतात. दारु मिसळलेलं ड्रिंक प्यायल्यानंतर जर्मन लोकांच्या गटाला नेदरलँडमधील लोकांसोबत डच भाषेत बोलण्यास सांगितलं. यातून अशी गोष्ट समोर आली की ज्या लोकांच्या ड्रिंकमध्ये अल्कोहल होतं त्यांनी शब्द स्पष्ट उच्चारले. विशेष म्हणजे वेगळ्या भाषेत बोलत असताना जराही अडखळले नाहीत.