how much effective remedivir treatment on coronavirus end who told truth
कोरोनावरील उपचारांत रेमडेसिवीर कितपत प्रभावी? अखेर WHO नेच सांगितली अशी आहे परिस्थिती

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिवीर या औषधाचा उपयोग केला जात आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) या औषधाच्या उपयुक्ततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

जीनिव्हा,स्वित्झर्लंड : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कुठलीही प्रभावी लस आलेली नाही. त्यामुळे कोरानाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांवर विविध माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिवीर या औषधाचा केला उपयोग केला जात आहे. मात्र आता डब्ल्युएचओने या औषधाच्या उपयुक्ततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

अमेरिकन औषधनिर्माता कंपनी गिलिएड सायन्सच्या रेमडेसिवीर औषधाचा वापर भारतात केला जात आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार करण्यासाठी याच औषधाचा वापर केला गेला होता.
मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेरिवीरच्या उपयुक्ततेबाबत सांगितले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात फारसे परिणामकारक दिसून आले नाही. या औषधामुळे रुग्णाच्या संसर्गाचे दिवसही कमी झाल्याचे दिसले नाही. दरम्यान, गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध परिणामकारक ठरले नाही.

डब्ल्युएचओने सांगितले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये एकूण चार औषधांचे परीक्षण करण्यात आले. ही सर्व औषधे कुठल्याना कुठल्या दैशामधील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत आहेत. या ट्रायलमध्ये रेमडेसिवीरसोबतच हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनावीर-रिटोनवीर आणि इंटरफेरॉन यांची तपासणी करण्यात आली.

या संसोधनादरम्यान, ३० देशांमधील ११ हजारांहून अधिक वयस्कर रुग्णांवर या औषधांच्या दिसून आलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ही औषधे बाधित रुग्णांवरील उपचारात कुठलेही सकारात्मक परिणाम देत नसल्याचे, तसेच मृत्युदरामध्येही फारसा फरक पाडत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, या संशोधनामध्ये औषधांचा कुठलाही परिणाम दिसून न आल्यानंतर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, अँटी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनावीर-रिटोनावीर यांच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले. या संशोधनाबाबतची माहिती लवकरच कुठल्यातरी मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर या संधोधनाला अधिकृतरित्या मान्यता मिळेल.

रेमडेसिवीर हे औषध अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे जे विषाणूला रेप्लिकेशनच्या स्टेजवर रोखून धरते. ही ती स्टेज असते जेव्हा विषाणू आपल्या शरीरामध्ये आपल्या कॉपीज तयार करायला सुरुवात करतो. या कॉपीज नंतर स्वत:च्या कॉपीज तयार करतात. त्यामुळे हळूहळू संसर्ग वाढत जातो.

एकदा विषाणू शरीरात शिरून त्याने कुठल्याही पेशीमध्ये प्रवेश मिळवला की तो आपले जेनेटिक मटेरियल रिलीज करतो. त्याला शरीरातील जुन्या मॅकॅनिझममधून कॉपी करण्यात येते.

आपली कॉपी तयार करण्यासाठी विषाणूच्या आरएनएमधून मिळालेल्या रॉ मटेरियलला प्रोसेस करावे लागते. जेव्हा रुग्णाला रेमडेसिवीर दिली जाते तेव्हा यामधील काही मटेरियलची कॉपी करतो आणि रेप्लिकेशन साइटमध्ये दाखल होतो. हळूहळू या मटेरियलच्या ठिकाणी केवळ रेमडेसिवीर उरते आमि विषाणूला रेप्लिकेट होण्यापासून रोखते.