ashraf ghani

तालिबा आणि अफगाणी सरकार हे आमचं दोघांचे अपयश आहे. कारण आम्ही कधीच आमचं सरकार आणि तालिबा दोघे स्वतःच्या समाधानापर्यंत पोहोचल नाही. माझ्या बाबत अनेक खोट्या बातम्या येत आहे कि मी देश सोडतांना रोकड घेऊन पळालो. मात्र हे आरोप पूर्ण पणे खोटे आहे.

    काबुल : अफगाणिस्तानात आता तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आहे. मात्र जेव्हा तालिबानी अफगाणिस्तान बळकावत होते तेव्हा  अफगाणिस्तानचे राष्ट्पती अशरफ घनी यांनी त्यांच्या देशाच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडत देशाबाहेर पळ काढला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय, घनी सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्सही पोहोचली होती. यावेळी त्यांनी पळून जातांना चार गाड्या भरून रोकड सोबत ठेवली होती. अशा संबंधित बातम्या चर्चेत आल्या. यावरून घनी यांच्यावर जगभरातून टीका करण्यात आली.त्यावर आता घनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    काय म्हणाले  घनी? 
    घनी यांनी सोशलवर पोस्ट लिहीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी पैसे घेऊन पळालो नाही, असं गनी यांनी म्हटलं आहे. ‘माझ्याकडे चप्पल बदलण्याचाही वेळ नव्हता, मी पैसे घेऊन पळालो नाही”,  असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
    ते पुढे म्हणाले,’तालिबा आणि अफगाणी सरकार हे आमचं दोघांचे अपयश आहे. कारण आम्ही कधीच आमचं सरकार आणि तालिबा दोघे स्वतःच्या समाधानापर्यंत पोहोचल नाही. माझ्या बाबत अनेक खोट्या बातम्या येत आहे कि मी देश सोडतांना रोकड घेऊन पळालो. मात्र हे आरोप पूर्ण पणे खोटे आहे. मी देशात असतो तर मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असता आणि हिंसा आणि नासधूस झाली असती म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला आहे. देश सोडतांना मला चप्पल बदलण्यासही वेळ नव्हता.’